क्रिकेट खेळाडू नाबालिक बालकाला बेदम मारहाण

-पालकाकडून आरोपी विरोधात तक्रार  पोलिसां चा संशयास्पद व्यवहार.
कामठी – कामठी तालुक्यातील  रनाळा गावातील प्रोफेसर कॉलनी येथील मैदानात क्रिकेट खेळत असताना वाल कंपाऊंड मध्ये गेलेला चेंडू बद्दल अश्लील शिवीगाळ करीत   बेदम मारहाण करणाऱ्या व्यक्ती बद्दल नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली नवीन  पोलिस स्टेशन कामठी  मधून मिळालेल्या माहितीनुसार रनाळा येथील प्रोफेसर कॉलनी मैदानात गावातील प्रत्येक कॉलनीतील मुलं क्रिकेट प्रशिक्षण व खेळण्याकरिता मैदानात येतात रविवारला सुट्टीच्या दिवशी परिसरातील 15 वर्षाच्या आतील  20 ते 25 मुले  क्रिकेट खेळत असताना तक्रार कर्ते नाबालिक बालक बॅटिंग करीत असताना चेंडू  मैदानाच्या लगतच असलेल्या अजय तानबा सोरते यांच्या वॉल कंपाऊंड मध्ये गेला. सोबत खेळणाऱ्या मुलाच्या आग्रहावरून तो मुलगा चेंडू  आणण्याकरिता वाल कंपाउंड मध्ये शिरला असता अजय सोरते यांनी त्याला पकडून अश्लील शिवीगाळ करीत कंपाऊंडच्या आत शिरल्यामुळे चोरीच्या आरोपात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली त्यानंतर परत जाऊन मैदानातून त्या नाबालिक मुलाला ओळत फडफडत आपल्या वाल कंपाऊंड मध्ये घेऊन  घरातील बॅट पत्नीच्या हाताने मागवीत बेदम मारहाण केली. पीडित नाबालिक बालकाने सदर घटना आपल्या पालकांना सांगितल्यावर पालकांनी अजय सोरते यांच्या घरी जाऊन विचारपूस केली असता   त्यांनी तुम्हाला जे बनते करून घ्या अशी धमकी दिली त्यावर पालकांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे जाऊन रीतसर तक्रार नोंदविली   त्यावर नवीन कामठी पोलीस स्टेशन तर्फ अजय तानबा सोरते वय 45 यांच्याविरोधात कलम 324 504 अंतर्गत गुन्हा नोंद करीत सूचना पत्र देत सोडण्यात आले
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

घरकुलाचे स्वप्नपूर्ण करणारे ‘ग्रामविकास’चे महाआवास अभियान            

Wed Dec 8 , 2021
      मुंबई : राज्यातील गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे, त्यांना पक्के व स्वत:च्या मालकी हक्काचे घर मिळावे यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन राज्यात 20 नोव्हेंबर 2020 पासून महाआवास अभियानाची सुरूवात केली. या पहिल्या टप्प्यात 1260 पेक्षा जास्त बहुमजली इमारती, 630 पेक्षा जास्त गृहसंकुले तसेच 750 घरकुल मार्ट सुरू करण्यात आले आहे. सोबतच  50 हजार 112 भूमीहिन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका अर्थाने महाआवास अभियानाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला. महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश पाहता दुसरा टप्पा दिनांक 20 नोव्हेंबर 2021 पासून सुरू झाला. यात 5 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. अन्य राज्याच्या तुलनेत हे महाआवास अभियान अधिक सक्षम आणि गतिमानतेने पुढे नेण्याचा निर्धार करत या पूर्ण अभियानात 7 डिसेंबर 2021 पर्यंत संपूर्ण राज्यात प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजनेच्या 9 लाख 88 हजार 691 घरांकरिता मंजुरी देण्यात आली असून 7 लाख 43 हजार 326 घरे पुर्ण झाली आहेत. दिनांक 20 नोव्हेंबर 2021 ते 7 डिसेंबर 2021 राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील 1071 घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे तर 4 हजार 684 घरे पूर्ण झाली आहेत. राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, पारधी, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना अशा विविध योजनेमार्फत 4 लाख 19 हजार 833 घरांकरिता मंजुरी देण्यात आली असून दिनांक 7 डिसेंबर 2021 पर्यंत 2 लाख 95 हजार 941 घरे पुर्ण झाली आहेत. 20 नोव्हेंबर 2021 ते 7 डिसेंबर 2021 या महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्य पुरस्कृत आवास योजनेतील 1 हजार 902 घरे बांधण्यात आली आहे. उर्वरित घरे विहित मुदतीत पूर्णत्वाकडे जातील, असा विश्वास ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे यांनी व्यक्त केला आहे. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!