नागपूर :- श्री. निकेतन बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित श्री निकेतन आर्ट्स कॉमर्स महाविदयालयामध्ये गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे व गांडूळ खत विक्री सोहळयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रकल्पाचे उद्घाटन मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला श्री निकेतन बहुउद्देशीय संस्थेचे सचिव प्रसाद गंधे व मनपाचे उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. श्रीबाला देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राम जोशी यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणातून मनपा, नागपूर यांच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबद्दलची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी ते कार्यक्रम स्वतःच्या घरी, मोहल्ल्यात राबवून कचरा कमी करण्याकरिता मनपा, नागपूरला सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेच गांडुळ खत व सेंद्रीय खताचे प्रकल्प प्रत्येक महाविद्यालयाने राबवावे असे मत त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. श्रीबाला देशपांडे यानी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रकल्प प्रमुख सारिका पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन प्रकल्प समन्वयक प्रा. विजय पाठक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक वर्ग व कार्यालयीन कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.
श्री. निकेतन महाविद्यालयात गांडुळ खत निर्मिती प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com