नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.21) 7 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ आणि धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 185 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धरमपेठ झोन अंतर्गत नेताजी मार्केट, सिताबर्डी येथील गोंदाडे फ्लॉवर शॉप या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील जय दुर्गा इन्ट्रप्राईजेस यांच्याविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच कॉटन मार्केट येथील आनंद किराणा स्टोअर्स, सुगन मोटर्स आणि हरि कृष्णा ट्रेडर्स या दुकानांविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे हनुमाननगर झोन अंतर्गत रेशिमबाग चौक येथील हरदास बिल्डर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत रामकृष्ण नगर दिघोरी येथील हरिहर इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.