सावनेर – कन्हान उपविभाग़ातील पो स्टे खापरखेडा हद्दीत गस्त करीत असताना माहितगार कडून गोपनीय माहिती मिळाली की, मौजा चानकापूर झोपडपट्टी येथे जमालं अहमद नावाचा इसम हा त्याचे घरी अंमली पदार्थ गांजा जवळ बाळगून अवैध रित्या त्याची विक्री करीत आहे अशा खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने मिळालेल्या माहिती प्रमाणे वरील इसमाच्या घरी जावून दोन शासकीय पंचांसमक्ष त्याची रितसर झड़ती घेतली असता त्यांचे ताब्यातून 709 ग्रॅम अंमली पदार्थ गांजा किमती 7000/- रुपयाचा माल तसेच अक्टिवा मो. सा. किं 40.000/- रू. एकूण किं.47000/- रू चा माल मिळून आला. सदर कारवाई दरम्यान मिळालेला मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलिस ठाणे खापरखेडा येथे अप. क्र. 493/2021 कलम 20, 22 NDPS ACT अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
ताब्यात घेण्यात आलेला आरोपी
1) शेख जमाल अहेमद शेख , वय 39 वर्ष, रा.वार्ड न.3,चनकापूर खापरखेडा ता.सावनेर , जि. नागपूर
2)मोहम्मद अस्लम अन्सारी वय 51 वर्ष रा. मोमीनपुरा नागपूर
वरील आरोपीची वैद्यकीय तपासणी करून जप्त मुद्देमालासह पुढील योग्य कायदेशीर कारवाईस्तव पोलीस स्टेशन खापरखेडा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कारवाई करणारे पथक
सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांचे मार्गदर्शनात सहा.पो.नि. अनिल राऊत , पोहवा विनोद काळे ,नाना राऊत ,पोना अरविंद भगत , शैलेश यादव , सत्यशील कोठारे, पोशी प्रणय बनाफर , विरेंद्र नरड , चालक साहेबराव बहाळे यांनी पार पाडली.
दिनेश दमाहे
9370868686