अवैध वृक्षतोड करणा-या दोन सागवन तष्कारांना पाच दिवसाची वन कोठडी; देवरी वनविभागाची कारवाई

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया :- जिल्ह्यातील उत्तर देवरी वनपरिक्षेत्रात दिनांक 28 सप्टेबंर रोजी मुल्ला सहवनक्षेत्रातील झुंझारीटोला बिटसंरक्षीत वन कक्ष क्र. 1614 मध्ये दोन सागवन थुट निदर्शनास आले होते. सदर थुटांवरुन चोरीला गेलेल्या मालाचा शोध उत्तर देवरी वनविभातर्फे घेण्यात आला.

गुप्त माहितीच्या आधारे देवरी तालुक्याच्या मौजा जमनापुर येथील गोपाल काशिराम गेडाम व गोपाल श्रीपत भंडारी यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता, त्यांच्याकडुन सागवन 03 नग घ.मी. 0.459 व सागवन चिराण माल 48 नग घ.मी. 1.166 एकुण 65,154/- किंमतीचा मुददे माल हस्तगत करण्यात उत्तर देवरी वनविभागाला यश आले. वरील दोन्ही आरोपींवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 33(1) क फं, 41 (1), 42 (1), 51 व 52 महाराष्ट्र वननियमावली 2014 चे कलम 31 अन्वये वनगुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली. न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय देवरी यांनी प्रकरणाच्या पुढील चौकशीकरीता आरोपींना पाच दिवसाची न्यायालयीन वन कोठडी मंजुर केली. पुढील तपास कुलराज सिंह, उपवनसंरक्षक वनविभाग गोंदिया, प्रदिप पाटील, सहाय्यक वनसंरक्षक गोंदिया व  सचिन धात्रक, वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इलेक्ट्रिक वाहनांकरिता चार्जिंग स्टेशन उभारा अन् मालमत्ता करात सूट मिळवा

Sat Oct 1 , 2022
प्रदूषण मुक्तीकडे वाटचाल करण्याचे आयुक्तांचे आवाहन नागपूर :-  वाहनातून निघणाऱ्या धुरामुळे वायू प्रदूषित होते. वायुप्रदुषणामुळे अनेक आजार उद्भवतात. इलेक्ट्रिकल वाहनांमुळे काही प्रमाणात वायुप्रदूषणावर आळा बसविण्यास मदत होते. अशात राज्य शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांकरिता चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या नागपूर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना / गृह निर्माण संस्थांना त्यांच्या मालमत्तेकरीता मालमत्ता करात शासनाचे कर वगळून 2 टक्के सूट देण्यात येणार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com