स्वच्छता आणि सुरक्षिततेचा संकल्प सर्वांपर्यंत पोहचवा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई :- “स्वच्छ समुद्र-सुरक्षित समुद्र” अभियानात दोन ते तीन हजार युवक सहभागी होत आहेत. या युवकांनी स्वच्छता आणि सुरक्षिततेचा संकल्प करावा, हा संकल्प सर्वांपर्यंत पोहोचवावा,युवकांनी स्वच्छता आणि सुरक्षितेसाठी उचललेले पाऊल अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने मुंबईत पाच जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या 75 दिवसांच्या ‘स्वच्छ समुद्र, सुरक्षित समुद्र’ अभियानातंर्गत आज सागरी किनारा स्वच्छता आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने गिरगांव चौपाटी येथे आयोजित विशेष स्वच्छता कार्यक्रमात  चव्हाण बोलत होते. यावेळी मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, अनंत सिंघानिया, समीर सोमय्या, अजित मांगरुलकर, रवींद्र सांगवी, भारतीय तटरक्षक दलातील वरिष्ठ आधिकारी यांच्यासह नागरिक आणि विद्यार्थ्यी उपस्थित होते.

रविंद्र चव्हाण म्हणाले, राज्याला 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. समुद्राच्या किनाऱ्यांच्या स्वच्छतेचे जबाबदारी नागरिकांची आहे, कोळी बांधवांशी समन्वय ठेऊन स्वच्छता आणि सुरक्षिततेवर लक्ष देणे गरजेचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन रविंद्र चव्हाण म्हणाले, राज्यात आजपासून 2 ऑक्टोबर पर्यंत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून लोकांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 2014 पासून देशात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी लोकजागरणाचा प्रयत्न केला आहे.

केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नियोजनानुसार भारताच्या किनार पट्टीवर राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेंतर्गत देशभारातील 75 समुद्र किनाऱ्यावर 75 दिवसांची अभियान राबविण्यात आली. मुंबईतील गिरगांव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ-मार्वे-अक्सा, गोराई-मनोरी किनाऱ्यांवर ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध स्वयंसेवी संस्थांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला. या कार्यक्रमादरम्यान स्वच्छता, गुणवंत कर्मचारी-संस्था यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मराठवाडा मुक्तिसंग्राम चित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.

Sun Sep 18 , 2022
औरंगाबाद  :-  मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांची माहिती नागरिकांना व्हावी, या उद्देशाने प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी झाले. मुक्तिसंग्रामाच्या देदीप्यमान इतिहासाचे अत्यंत प्रभावी दर्शन या प्रदर्शनातून होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयातर्फे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या सहकार्याने आयोजित हे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!