रामटेक – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार दिनांक १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसंदर्भात विशेष मोहिमांचा कालावधी दिनांक १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत राबविण्यात येत आहे. तसेच १३ नोव्हेंबर २०२१ व दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ तसेच दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ व २८ नोव्हेंबर २०२१ रोजी ५९ रामटेक विधानसभा मतदार संघातील रामटेक तालुक्यात मतदार नोंदणी बाबत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
करीता रामटेक तालुक्यातील सर्व नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येते की, सदर कालावधीत आपण आपले नाव मतदार यादीत नोंदविणे, नावाची मतदारयादीतून वगळणी करणे, मतदार यादीतील चुकीच्या नावाची दुरुस्ती करणे इ. मतदार यादीशी संबंधित कामे करु शकता. त्यामुळे सर्व रामटेक तालुक्यातील नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येते की, आपण सदर दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ व २८ नोव्हेंबर २०२१ या विशेष मोहिमेच्या कालावधीत संबंधित मतदान केंद्र सहायक मतदान नोंदणी अधिकारी कार्यालय, मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय या ठिकाणी जावून आपण ३० नोव्हेंबर २०२१ रोजीपर्यंत आपण आपले नाव मतदार यादीत नोंदणी करुन घ्यावे.असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी संपूर्ण जनतेला केले आहे.