२०१८ पासून आता पर्यंत १४० लोकांनी केले नेत्र दान ; राज्यात गोंदिया दुसऱ्या क्रमांकावर
अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – गोंदिया येथे नेत्रदान पंधरवडा निमित्त रॅली काढण्यात आली आशुने हि रॅली शहरात भरमन करीत नेत्रदान करावे याची जनजागृती असुन २५ ऑगस्ट पासून ते ८ सप्टेंबर पर्यंत हे जनजागृती कार्यक्रम करण्यात येणार आहे. या मध्ये शाळा, कॉलेज, तसेच गावो-गावी जाऊन सार्वजनिक गणेश मंडळ अश्या अनेक ठिकाणी जाऊन पठणाथय द्वारे सुद्धा नेत्रदान करण्यासाठी लोकांना जनजागृती या पंधरवडा दरम्यान करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे गोंदिया जिल्ह्यात २०१८ पासून ते आतापर्यंत १४० लोकांनी आपले नेत्र दान केले आहेत तर. जिल्ह्यातील ८०० लोकांनी आपले नेत्र दान करण्यासाठी रजिष्टरेशन केले आहे. तर नेत्रदान मध्ये महाराष्ट्रा मध्ये गोंदिया जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.