संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
पुरेसे शिक्षक द्या, शिक्षकांना शिकवु द्या.
अखिल महा. प्राथ. शिक्षक संघाची मागणी.
कन्हान : – केंद्रशासन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविताना इयत्ता तिसरी पर्यंत च्या बालकाला पाया भुत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य प्रत्येक बालकाने अवगत करावे अशी अपेक्षा केलेली आहे. त्या करीता ‘निपुन भारत’ अभियान राबविण्यात येत आहे. या साठी विविध प्रशिक्षणे ऑनलाईन, ऑफलाईन बैठका, शिक्षण परिषदा द्वारे शिक्षकांचे उद्बोधन केल्या जात आहेत, निपुन भारत अभियान राबविण्याची प्रतिज्ञा शिक्षक व या क्षेत्रातील सर्वांकडुन घेतल्या जात आहे.
परंतु हे अभियान राबविण्यास विद्यार्थ्यांना शिकविण्या स पुरेसे शिक्षकच नसतील आणि आहे ते शिक्षक विविध प्रकारच्या अशैक्षणिक व कारकुणी कामात सतत व्यस्त राहत असतील, एका शिक्षकाकडे तीन वर्ग, एका शिक्षकाकडे पाच वर्ग असतील तर निपुन भारताचे स्वप्न साकार कसे होणार ? निपुन बालक कसा घडणार ? यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघा तर्फे देशभर स्वाक्षरी अभियान राबविले जात आहे. देशभरातुन शिक्षकांच्या स्वाक्ष-यांचे एक त्रीत निवेदन भारताचे महामहीम राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघा द्वारे चालविलेल्या स्वाक्षरी अभियानात मोठ्या संख्येत सहभागी होण्या च्या जिल्हाध्यक्ष धनराज बोडे, सरचिटणीस विरेंद्र वाघमारे, गोपारराव चरडे, रामु गोतमारे, सुनिल पेटकर, सुभाष गायधने, ज्ञानेश्वर वंजारी, आनंद गिरडकर, अशोक बावनकुळे, गजेंद्र कोल्हे, पंजाब राठोड, लोकेश सुर्यवंशी, दिलीप जिभकाटे, अशोक डोंगरे, उज्वल रोकडे, मनोज बोरकर, प्रेमचंद राठोड, वसंत बलकी, राजेश मथुरे, आशा झिल्पे, सिंधु टिपरे, सुनंदा देशमुख, आशा बावनकुळे, श्वेता कुरझडकर, नंदा गिरडकर, वंदना डेकाटे आदिंनी केली आहे.