संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 24 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील यादव नगर येथे आज झालेल्या मुसळधार पावसाने सकाळी नऊ वाजता सुमारास घर कोसळल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून सकून नरसिंह यादव वय 62 असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे,. गंभीर जखमी महिलेला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार गेल्या बारा दिवसापासून कामठी शहर व ग्रामीण भागात मुसळधार पावसाने थैमान सुरू केले असून आज पहाटे चार वाजेपासून शहर व ग्रामीण भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती सकाळी नऊ वाजता सुमारास प्रभाग क्रमांक 14 यादव नगर येथील शकुन नरसिंह यादव यांचे घर कोसळले त्यादरम्यान सखून घरात असताना त्या गंभीर जखमी झाल्या घर कोसळताच शेजारी नागरिक धावून आले व त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात भरती केले. घर मुसळधार पावसाने घर कोसळल्याने त्यांचे दीड ते देऊन लाख रुपयाचे नुकसान झाले घटनेची माहिती कामठीचे तहसीलदार अक्षय पोयाम यांना मिळताच त्यांनी मंडळ अधिकारी महेश कुलदीवार यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.