स्मार्ट सिटीच्या १५ बसेस संदर्भात टाटा मोटर्ससह करार

आपली बसच्या ताफ्यात होणार आणखी १५ ई-बसचा समावेश

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आपली बसच्या ताफ्यामध्ये आणखी १५ बसेसचा समावेश होण्याला गती मिळाली. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या १५ मिडी ए.सी. इलेक्ट्रिक बसेस नागरिकांकरिता नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाला देण्यात येणार आहेत. यासंदर्भात झालेल्या करारनाम्यावर गुरूवारी (ता.९) स्वाक्षरी करण्यात आली.

यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. , स्मार्ट सिटीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी  चिन्मय गोतमारे, मोबिलिटी आणि इन्फ्रा विभागाचे महाव्यस्थापक  राजेश दुफारे, परिवहन व्यस्थापक  रवींद्र भेलावे, प्रशासकीय अधिकारी  रवींद्र पागे, टाटा मोटर्सचे आदित्य छाजेड उपस्थित होते.

१५ इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीसाठी स्मार्ट सिटीतर्फे निविदा मागविण्यात आले होते. मेसर्स टाटा मोटर्स यांची निम्नतम निविदा असल्याने बसेसच्या पुरवठ्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. इलेक्ट्रिक बसेसच्या पुरवठ्या संदर्भात टाटा मोटर्सचे आदित्य छाजेड यांच्यासोबत करार करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागरी समस्या निवारण केंद्रांद्वारे आतापर्यंत 283 तक्रारींचे निराकरण

Fri Jun 10 , 2022
नागपूर : नागरिकांच्या मुलभूत तक्रारींच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे झोनस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कोरोना नियंत्रण कक्षांना ‘नागरी समस्या निवारण केंद्र’ म्हणून कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून गुरुवारी 9 जून पर्यंत झोन स्तरावर नागरी समस्या निवारण केंद्रांमध्ये 389 तक्रारी प्राप्त झालेल्या असून आतापर्यंत दहाही झोनमधील 283 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!