संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 6:- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्र. १ अंतर्गत कामगार कल्याण केन्द्र कामठी द्वारा ऑरेंजसिटी स्टिल इंडस्ट्रीज कामठी रोड नागपुर येथे काल पाच जून रोजी आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सव वर्ष असल्यामुळे ७५ झाडे लावण्यात आली.
निर्मल पुरोहित अकाउंट ऑरेंजसिटी स्टिल इंडस्ट्रीज कामठी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिनेश मासीरकर डिसप्याच ईन्चार्ज, विशेष उपस्थिती .हेमंत रामटेके , दिनेश ठाकुर, दिपक नाराथीन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन हेमंत जौजाळ केन्द्र प्रमुख कामठी यांनी केले. आभार शुभदा गळगटे केन्द्र महिला कल्याण सहायिका यांनी केले.
कार्यक्रमाला कर्मचारी व परिसरातील नागरीक उपस्थित होते.
वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com