महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)
• नागपूर मेट्रो रेल फेज – १ प्रकल्प पूर्ण
• नागपूर मेट्रो फेज – २ च्या दिशेने नागपूर मेट्रोची वाटचाल
• नागपूरकरांच्या सहकार्यामुळे कार्य जलद गतीने होण्यास मदत
नागपूर : २१ ऑगस्ट २०१४ रोजी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे भूमिपूजन व २०१५ पासून नागपूर शहरात मेट्रो रेल प्रकल्पाच्या निर्माण कार्याला सुरुवात झाली. २०१५ ते २०२३ – या आठ वर्षाचा प्रवास महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पासाठी यशाचे अनेक शिखर गाठणारे ठरले, या वर्षात नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फेज – १ पूर्ण झाला व नागपूर मेट्रो नागपूरकरांच्या दैनंदिन प्रवासाचा सोबती झाला.
या सोबतच नागपूर मेट्रोने अनेक कीर्तिमान स्थापित करत आशियाच नव्हे तर विश्व कीर्तिमान देखील स्थापित केला ज्यामध्ये वर्धा रोड डबल डेकर व्हाया-डक्टची संपूर्ण जगात मेट्रो श्रेणीतील सर्वात लांब डबल डेकर म्हणून अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. नागपूर मेट्रोच्या कार्याचा गौरव इतर राज्यातील शहरांमध्ये देखील होत आहे.
या व्यतिरिक्त नुकतेच नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज – २ चा शिलान्यास झाला व फेज – २ कडे नागपूर मेट्रोची वाटचाल व नवीन आव्हानांना करिता घोड दौड सुरु झाली. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचा फेज – २ हा ४३.८ कि.मी लांबीचा असून यामध्ये ३२ मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे निर्माण कार्य करतांना नागरिकांच्या सहकार्यामुळे कार्य जलद गतीने होण्यास मदत झाली. नागपूर मेट्रो ही निश्चितच नागपूरकरांची मेट्रो अशी माझी मेट्रो आहे.
मेट्रोच्या कामठी मार्ग व सेंट्रल एव्हेन्यू मार्गिकेचे लोकार्पण झाल्यानंतर प्रवासी सेवेमध्ये दिवसें दिवस वाढ झाली आहे. नागपूर मेट्रो, नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतुकीची पहिली पसंती ठरली असून एकाच दिवसात 2 लाख 20 हजार प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करत विक्रम केला. नागपूर मेट्रो आता शहराच्या चारही बाजूने सुरु झाली असून यामध्ये कॉलेज व शाळेत जाणारे विद्यार्थी, नौकरीदार तसे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात मेट्रोने प्रवास करत असून सकाळी ६ वाजता पासून ते रात्री १० वाजता पर्यंत दर १५ मिनिटांनी मेट्रो नागरिकांन करता उपलब्ध आहे.
२०१४• २१ ऑगस्ट २०१४ रोजी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते भूमिपूजन
२०१५ ते २०२३ वर्षात घडलेल्या घडामोडीवर एक नजर :
• १८ फेब्रुवारी २०१५: नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची स्थापना
• ३१ मे २०१५: नागपूर मेट्रोच्या कार्याची (कार्यारंभ) सुरुवात.
• १० एप्रिल २०१५ : केएफडब्ल्यू आणि नागपूर मेट्रो दरम्यान ५०० मिलियन युरो करीता ऋण करार.
• १७ नोव्हेंबर २०१५ : एएफडी फ्रांस आणि नागपूर मेट्रो दरम्यान १३० मिलियन युरो करीता ऋण करार
• २३ जानेवारी २०१७ : नागपूर मेट्रोचे महा मेट्रो मध्ये रुपांतर
• ४ एप्रिल २०१७ : राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त मेट्रो कर्मचाऱ्यांची मानवी साखळीचे लिमका बुक आणि इंडिया बुक मध्ये नोंदणी
• २ ऑगस्ट २०१७ : पहिल्या ३ मेट्रो कोच नागपूर शहरात दाखल
• ३० सपटेबर २०१७ : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ट्रायल रनला सुरुवात आणि महा कार्ड लौंच
• २१ एप्रिल २०१८ : एयरपोर्ट साउथ ते खापरी दरम्यान जॉय राईड सुरु
• २२ नोव्हेंबर २०१८ : चीन येथील सीआरआरसी डालीयन प्लांट येथून मेट्रो ट्रेन रवाना
• ८ जानेवारी २०१९ : नागपूर मेट्रोच्या रु.११२१६ कोटी खर्चाच्या फेज- २ मेट्रो प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी.
• ७ मार्च २०१९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारे नागपूर मेट्रो ऑरेंज लाईन(खापरी से सीताबर्डी इंटरचेंज) चे लोकार्पण या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि इतर मंत्री गण प्रामुख्याने उपस्थित होते.
• ९ डिसेंबर २०१९ : तेलगांना सरकार ने वारांगल शहराकरिता मेट्रो नियो डीपीआरचे कार्य महा मेट्रोला सौपविले
• २८ जानेवारी २०२० : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे द्वारे नागपूर मेट्रो अँक्वा लाईन (सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर) चे लोकार्पण या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हरदीप सिंह पुरी आणि इतर मंत्री गण प्रामुख्याने उपस्थित होते.
• २६ फेब्रुवारी २०२० : गड्डीगोदाम येथे महा मेट्रोच्या मल्टी लेयर ट्रान्सपोर्ट सिस्टमच्या निर्माण कार्याला सुरुवात
• ०४ जून २०२० : : महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाला आयएसओ १४००१:२०१५ चे प्रमाणपत्र
• ०८ ऑक्टोबर २०२० : मेट्रो भवनला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलतर्फे सर्वोच्च `प्लॅटिनम’ दर्जा
• १६ ऑक्टोबर २०२० : : “कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इयर २०२०’”पुरस्कार महा मेट्रो व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीक्षित यांना प्रदान
• १३ नोव्हेंबर २०२० : वर्धा मार्गवरील डबल डेकर उडडाणपूलाचे उद्घाटन, सदर कार्यक्रमास केंद्रीय मंत्री, रस्ते परिवहन व महामार्ग, आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास, भारत सरकार, राज्याचे गृह मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रामुख्याने उपस्थित होते.
• १ फेब्रुवारी २०२१ – नागपूर मेट्रो फेज – २ आणि नाशिक मेट्रो नियो प्रकल्पाला क्रमश: ५९७६ व २०९२ करोड रुपये ची घोषणा केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभा येथे केली.
• ६ एप्रिल २०२१ – उज्जवल नगर, छत्रपती चौक, काँग्रेस नगर आणि धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन मेट्रो प्रवाश्यान करता सुरु.
• २० ऑगस्ट २०२१ – १.६ किलोमीटर लांब सिताबर्डी-झिरो माईल स्टेशन-कस्तुरचंद पार्क स्टेशन व फ्रिडम पार्कचे उदघाटन झाले. या कार्यक्रमाला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर (व्हिडियो लिंकद्वारे) आभासी पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन महाराष्ट्राचे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ नितीन राऊत, पशु संवर्धन, दुग्ध व्यायसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान सभा देवेंद्र फडणवीस या सोहळ्याला उपस्थित होते.
• २९ ऑक्टोबर २०२१ – भारत सरकारच्या, गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय द्वारे महा मेट्रोला एक्ससेलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्टचा पुरस्कार नागपूर मेट्रोला नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गृहनिर्माण आणि शहरी विकास हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना प्रदान करण्यात आला. मल्टिमॉडेल इंटिग्रेशन उत्कृष्टरित्या अंमलबजावणी करण्याकरिता महा मेट्रोची यामध्ये निवड करण्यात आली.
• ११ जानेवारी २०२२ – महा मेट्रो औरंगाबाद शहराकरिता मेट्रो रेल प्रकल्प व उड्डाणपुलाचा डीपीआर तयार करण्यास सांगण्यात आले
• ४ फेब्रुवारी २०२२ – महा मेट्रोने गड्डीगोदाम (गुरुद्वारा) येथे ८०० टन वजनाचे स्ट्रकचर रेल्वे ट्रॅकवर स्थापित करण्यात आले
• १० जुलै २०२२ – वर्धा मार्गावरील डेबल डेकर पूल व त्यावरील तीन मेट्रो स्टेशन तयार करणारी महामेट्रो व राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाची (एनएचएआय) नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् ने घेतली. या दोन्ही संस्थांकडून आज महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित व भारतीय राष्ट्रीय महामार्ग (एनएचएआय) चे राजीव अग्रवाल यांना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
• ६ सप्टेंबर २०२२ – नागपूर मेट्रोला जिओ स्पॅशियल वर्ल्ड – मीडिया क्षेत्रातील एका नामांकित संस्थेतर्फे नागपूर मेट्रो प्रकल्पाला `एक्सलंस मेट्रो प्रकल्प अवॉर्ड’ मिळाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि नागरी उड्डयन राज्य मंत्री श्री व्ही के सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
• ११ सप्टेंबर २०२२ – आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे आयोजित `इंटरनॅशनल रेकॉर्डस् फेस्टिव्हल – २०२२’ अंतर्गत महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांचा दिल्ली येथील चौथ्या जागतिक पातळी वरील विक्रम धारकांमध्ये समावेश झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.
• ७ डिसेंबर २०२२ – वर्धा रोड डबल डेकर व्हाया-डक्टची संपूर्ण जगात मेट्रो श्रेणीतील सर्वात लांब डबल डेकर म्हणून अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. लंडन येथे मुख्यालय असलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे एकजुडिकेटर ऋषी नाथ यांनी डॉ. दीक्षित यांना प्रमाणपत्र प्रदान करत सत्कार केला.
• ११ डिसेंबर २०२२ – महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सेंट्रल एव्हेन्यू आणि कामठी मार्गावरील मेट्रो रेल्वे सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले तसेच नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फेज – २ चा शिलान्यास देखील या दिवशी पार पडला.