सरपंच पदासाठी 90 तर सदस्य पदासाठी 620 उमेदवार निवडणूक रिंगणात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- येत्या 18 डिसेंबरला होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 27 ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी एकूण 90 उमेदवार तर 93 प्रभागातील 247 सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी 620 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

काल 7 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम कालावधीत थेट जनतेतून निवड होणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आरक्षित जागेतून एकूण 119 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते त्यातील 29 उमेदवारांनी स्वेच्छेने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 90 उमेदवार निवडणूक रिंगनात कायम आहेत तर सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी एकूण 678 उमेदवारी अर्जापैकी 58 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने एकूण 620 उमेदवार निवडणुक रिंगणात कायम आहेत.

यानुसार 27 ग्रा प सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी खैरी ग्रा प च्या सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून 5 उमेदवार,रणाळा ग्रा प च्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग खुला प्रवर्गातून फक्त 2 उमेदवार,येरखेडा ग्रा प च्या अनुसूचित जाती खुला प्रवर्गातून 05 उमेदवार, बिना ग्रा प च्या नामाप्र प्रवर्गातून 2 उमेदवार, भिलगाव सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून 03 उमेदवार खसाळा ग्रा प च्या सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून 05 उमेदवार,सुरादेवी ग्रा प च्या अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गातून 06, खापा ग्रा प च्या नामाप्र स्त्री प्रवर्गातून 02 उमेदवार, कढोली ग्रा प च्या सर्वसाधारण खुला प्रवर्गातून 04 उमेदवार, भोवरी ग्रा प च्या सर्वसाधारण खुला प्रवर्गातून 03 उमेदवार, आजनी ग्रा प च्या नामाप्र खुला प्रवर्गातून 02 उमेदवार,लिहिगाव ग्रा प च्या अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गातून 2 उमेदवार, कापसी(बु) सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून 2 उमेदवार, गादा ग्रा प च्या सर्वसाधारण खुला प्रवर्गातून 06 ,सोनेगाव ग्रा प च्या सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून 03 ,गुंमथी ग्रा प च्या सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून 03,आवंढी ग्रा प च्या अनुसूचित जाती खुला प्रवर्गातून 02,गुमथळा नामाप्र स्त्री प्रवर्गातून 03,तरोडी(बु) ग्रा प च्या सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून 03,परसाड ग्रा प च्या नामाप्र खुला प्रवर्गातून 03,जाखेगाव ग्रा प च्या नामाप्र स्त्री प्रवर्गातून 03,केम ग्रा प च्या सर्वसाधारण खुला प्रवर्गातून 02,दिघोरी ग्रा प च्या सर्वसाधारण खुला प्रवर्गातून 02,आडका ग्रा प च्या सर्वसाधारण खुला प्रवर्गातून 04 ,शिवणी ग्रा प च्या सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून 03,भुगाव ग्रा प च्या अनुसूचित जाती खुला प्रवर्गातून 04 तर वडोदा ग्रा प च्या सर्वसाधारण खुला प्रवर्गातून 06 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले असून 93 प्रभागातील 247 सदस्य पदासाठी 620 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.तर आजनी ग्रा प च्या अनुसूचित जमाती स्त्री व नागरिकांचा मागासवर्ग स्त्री प्रवर्गातील प्रत्येकी एका उमेदवारांच्या विरोधात दुसरे कुणीही प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने त्या दोन्ही महिला उमेदवार बिनविरोध निवडुन आल्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी समन्वयाने नियोजन करावे - सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण  

Thu Dec 8 , 2022
मुंबई :- ‘कोविड – १९’ मुळे नागपूर येथे दोन वर्षांच्या खंडानंतर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनासाठी येणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आदी सर्वांच्या निवासव्यवस्थेचे संबंधित सर्व विभागांनी काटेकोर आणि अचूकपणे नियोजन करावे. कोणाचीही कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. हिवाळी अधिवेशनाच्या काळात केलेल्या सर्व व्यवस्थेची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्याच्यादृष्टीने मोबाईल ॲप तयार करावे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!