सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 81 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई   

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. सोमवारी (ता. 08) रोजी उपद्रव शोध पथकाने 81 प्रकरणांची नोंद करून 33 हजार 200 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 21 प्रकरणांची नोंद करून 8 हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 8 प्रकरणांची नोंद करून 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 08 प्रकरणांची नोंद करून 3 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मॉल, उपहारगृह, लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करुन 1 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 34 प्रकरणांची नोंद करून 6 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 05 प्रकरणांची नोंद करून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 02 प्रकरणांची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सोमवारी (ता. 08) रोजी प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या लकडगंज झोन अंतर्गत अनिल डेअरी व बॅकरी मीनीमाता नगर आणि सतरंजीपुरा झोन अंतर्गत धकाते अगरब्बती शॉप मारवाडी चौक ईतवारी या दोन प्रतिष्ठानांकडून एकुण 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय लक्ष्मीनगर झोन अंतर्गत राईस असोसिएट्स सुरेंद्र नगर आणि विलास पाटणे रामदासपेठ रस्त्याच्या कडेला कचरा टाकणेबाबत यांच्याकडून 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत देविकर कन्ट्रक्शन्स माधव नगर आणि धंतोली झोन अंतर्गत एस आर कन्ट्रक्शन्स बैद्यनाथ चौक, वेलवेट इन्फ्रा बिल्डर्स नरेंद्र नगर रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकण्याबाबत या तीन प्रतिष्ठानांकडुन एकुण 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत गुरुछाया रेसिडेन्सी फेंड्रस कॉलोनी काटोल रोड आणि मंगळवारी झोन अंतर्गत माय कम्पयुटर मंगळवारी मार्केट सदर परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास यांच्याकडून 10 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 09 प्रकरणांची नोंद करून 60 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपाचे सर्व झोन कार्यालय, अंगणवाडी केंद्रांवर ऑनलाईन अर्ज करण्याची सोय

Tue Jul 9 , 2024
– मोठ्या संख्येत “मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या : आयुक्त नागपूर :- महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्याकरिता आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना” सुरु करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात शहरातही योजना यशस्वीपणे राहाविण्यात येणार असून, मोठ्या संख्येत महिलांनी “मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com