सावनेर : इंडियन मेसिकल असोसिएशन येथे आयएमचे अध्यक्ष डॉ.आशिष चांडक यांचा हस्ते सकाळी १० वाजता ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर आयएमए परिसरात बहुतांश सदस्यांनी “मेरी मटी मेरा देश” अंतर्गत वृक्षारोपन केले.तसेच “मेरी माती मेरा देश”च्या सेल्फी पॉईंटवर फोटोग्राफिक आठवणी गोळा केल्या.
यावेळी डॉ.चांडक यांनी सगळ्यांना स्वतंत्रता दिनाचा शुभेच्छा देत देशाला स्वतंत्र करण्याकरिता ज्या वीर पुरुषांनी आपल्या जीवीचे बलिदान दिले यांना नमन करून त्यांचा बलिदानाने देशाला स्वतंत्र मिळाले त्या आठवणी ताज्या करून स्वतंत्रता दिवसाचे महत्व पटवून दिले. व आपल्या देशाचा सीमेवर आपल्या रक्षणाकरिता तैनात असलेल्या जवानांचे अभिनंदन करून त्यांचे आभार व्यक्त केले.
धवजारोहनानंतर उपस्थितांना मिठाई वाटप करण्यात आलीयावेळी मोठ्या संख्येने आयएमचे सदस्य डॉ.विलास मानकर ( उपाध्यक्ष ) डॉ. परेश झोपे( उपाध्यक्ष), डॉ प्रवीण चव्हाण (कोषाध्यक्ष), डॉ अमित बाहेती (सहसचिव) , डॉ.विजय धोटे, डॉ.विजय घटे, डॉ. चंद्रकांत मानकर , डॉ.अशोक जैसवाल , डॉ अशोक देशमुख , डॉ ज्योत्सना धोटे,डॉ संगीता जैन,डॉ.प्राची भगत, डॉ.रेणुका चांडक , डॉ.निलेश कुंभारे, डॉ. उमेश जिवतोडे , डॉ हेमंत पाटील , डॉ.नरेंद्र डोमके , डॉ.नितीन पोटोडे,डॉ सचिन घटे ,डॉ. जयंत कडसकर , डॉ.,मयूर डोंगरे डॉ.सोनाली कुंभारे, डॉ गौरी मानकर,डॉ मोनाली पोटोडे, डॉ.कंचन डोमके , डॉ.अंकिता बाहेती, डॉ. पूजा जिवतोड़े ,डॉ. रश्मी भगत डॉ श्वेता चव्हाण , डॉ. स्वाती पुण्यानी उपस्थित होते
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयएमचे सचिव डॉ.शिवम पुण्यानी यांनी केले.