नागपुरात ‘शासन आपल्या दारी’चे ७ लाखावर लाभार्थी

– उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मध्य नागपुरातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

नागपूर :- ‘शासन आपल्या दारी’ अभियानाद्वारे शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोचवून त्याचे जीवन सुखकर करण्याचे शासनाचे ध्येय आहे. या अभियानांतर्गत नागपुरात जनसामान्यांना लाभ देण्याचे चांगले कार्य सुरू आहेत. आतापर्यंत ७ लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून प्रशासनाने लवकरच २० लाख लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचविण्याचे उद्दिष्ट गाठावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

शहरातील मॉडेल मिल चौकातील गाडीखाना क्रीडा मैदानावर मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आमदार विकास कुंभारे यांनी ‘शासन आपल्यादारी’ अभियानांतर्गत आयोजित केलेल्या शिबिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री प्रवीण दटके, विकास कुंभारे, मोहन मते, कृष्णा खोपडे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, माजी आमदार डॉ. मिलींद माने, माजी आमदार परिणय फुके, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर अर्चना डेहनकर, माजी नगरसेवक जितेंद्र (बंटी) कुकडे, ॲड. संजय बालपांडे, सुधीर (बंडू) राऊत, संजय महाजन, प्रमोद चिखले, दीपराज पार्डीकर, प्रमोद पेंडके, माजी नगरसेविका सुमेधा देशपांडे, नेहा वाघमारे, सरला नायक, रामभाऊ आंबुलकर, जयप्रकाश पारेख आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यातील जनतेला सरकारी योजनांचे लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राज्यात या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत दीड कोटी जनतेला लाभ देण्यात आला आहे. नागपुरात या कार्यक्रमांतर्गत विविध शिबिरांचे आयोजन करून आजपर्यंत ७ लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. प्रशासकीय यंत्रणेने गतीने कार्य करीत या कार्यक्रमांतर्गत २० लाख लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याचे ध्येयपूर्ण करण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.

लोकशाहीत शासन हे जनतेला जबाबदार असते आणि त्याच दिशेने राज्यशासन कार्य करीत असून विविध जनकल्याणकारी निर्णय घेण्यात आले आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील सर्वच जनतेला ५ लाखापर्यंतचे लाभ देण्यात येत आहेत. नागपुरातील दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयात उच्च व गुणात्मक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. मध्य नागपूर विधानसभा मतदासंघात ४ सप्टेंबर पासून ‘शासन आपल्यादारी’ अभियानांतर्गत आयोजित शिबिरातून जनतेला रेशन कार्ड, चष्मे वितरण, भूमी पट्टे वितरण असे विविध लाभ देण्यात येत असून ही समाधानाची बाब असल्याचे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार विकास कुंभारे यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन किशोर पालांदूरकर यांनी केले. आभार विनायक डेहनकर यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सेंट फ्रांसेस टी.एस.के. इंग्लिस स्कूल, चंद्रपुर येथील खेळाडूं राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत निवड

Wed Sep 6 , 2023
चंद्रपूर :- नागपुर ( खापरखेड़ा ) येथे होणाऱ्या १४ वी राज्यस्तरीय सब ज्युनिअर ( मुले व मूली ) टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा दिनांक ०८ ते १० सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न होत आहे. या स्पर्धेकरिता सेंट फ्रांसेस टी.एस.के. इंग्लिस स्कूल, चंद्रपुर येथील खेळाडूंची चंद्रपूर जिल्हा सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चंद्रपूर जिल्ह्याच्या संघात निवड झालेली आहे. २० ऑगस्ट २०२३ रोजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com