सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 69 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (30) रोजी शोध पथकाने 69 प्रकरणांची नोंद करून रु. 49,200/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 19 प्रकरणांची नोंद करून रु.7,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु. 300/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून रु. 2,400/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 21,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 3,000 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/ साठवणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 17 प्रकरणांची नोंद करून रु. 3,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 9 प्रकरणांची नोंद करून रु. 9,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. देवभुमी डेवलपर्स यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. तसेच जावेद शेख यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोन अंतर्गत नीखील चौरे यांनी वैद्यकिय वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत शीवांगी आर्ट भंडार, मुंबई आर्ट भंडार, नयन आर्ट भंडार, भुषन आर्ट भंडार, आयुष आर्ट भंडार यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 50,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. राकेश मुर्ती भंडार यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत रू. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. आशीनगर झोन अंतर्गत मे. वक्रतुंड मुर्ती भंडार, मे. दक्ष मुर्ती भंडार यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 20,000/- चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 11 प्रकरणांची नोंद करून रू. 1,00,000/- दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अंतीम यादी प्रसिद्ध : जिल्ह्यात 47 हजार 506 मतदारांची वाढ

Sat Aug 31 , 2024
Ø जिल्ह्यात 22 लाख 25 हजारावर मतदार Ø एक हजार पुरुष मतदारांमागे 952 महिला  यवतमाळ :- दुसऱ्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार दिनांक १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत अंतीम मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर यादी मतदारांच्या माहितीकरिता उपलब्ध करण्यात आली आहे. मतदारांनी यादीत आपल्या नावाचा योग्य प्रकारे समावेश झाला आहे की नाही हे तपासावे, असे आवाहन करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com