27 ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी आज 122 मतदान केंद्रावर 68 हजार 185 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-मतदान साहित्य घेऊन मतदान पथक झाले रवाना

कामठी :- कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतून सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी आज 18 डिसेंबरला सकाळी साडे सात ते सायंकाळी 5.30वाजेपर्यंत 122 मतदान केंद्रावर निवडणूक मतदान होणार असून या मतदान केंद्रावर राहणाऱ्या मतदान केंद्र निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना काल 17 डिसेंबर ला सकाळी आठ वाजेपासूनच निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय पोयाम यांच्या मुख्य मार्गदर्शनार्थ 122 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्र अधिकारी असे एकूण 122 मतदान केंद्र पथकांना निवडणूक साहित्याचे ईव्हीएम संच, विहित लिफाफे नमुने, मतदार यादी तीन प्रति, मतदान कक्ष, केंद्रधक्ष्याची माहिती पुस्तिका आदी साहित्यासह 14 एस टी बस व्यवस्थेने रवाना करण्यात आले.

या निवडणुकीत एकूण 68 हजार 185 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये एकूण पुरुष मतदान 34 हजार 674 तर स्त्री मतदान 33 हजार 509 आहेत तर 2 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष , तीन मतदान केंद्र अधिकारी तसेच एक पोलीस कर्मचारी तसेच एक होमगार्ड ची व्यवस्था करण्यात आली असून यानुसार 610 मतदान केंद्र कर्मचारीची नियुक्ती करण्यात आली आहे.

18 डिसेंबर ला 27 ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतून निवड होणाऱ्या 27 सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी 90 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर 93 प्रभागातील 247 सदस्य पदाच्या निवडीसाठी 620 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत .यानुसार एकूण 710 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत .27 ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकित तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मानल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायत च्या निवडणुकीत थेट जनतेतून होणाऱ्या सरपंच पदाच्या निवडीसाठी अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गातून पाच उमेदवार तर खैरी ग्रा प च्या सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून 5 उमेदवार,रणाळा ग्रा प च्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग खुला प्रवर्गातून फक्त 2 उमेदवार, बिना ग्रा प च्या नामाप्र प्रवर्गातून 2 उमेदवार,भिलगाव सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून 03 उमेदवार खसाळा ग्रा प च्या सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून 05उमेदवार, सुरादेवी ग्रा प च्या अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गातून 06,खापा ग्रा प च्या नामाप्र स्त्री प्रवर्गातून 02उमेदवार,कढोली ग्रा प च्या सर्वसाधारण खुला प्रवर्गातून 04 उमेदवार, भोवरी ग्रा प च्या सर्वसाधारण खुला प्रवर्गातून 03 उमेदवार, आजनी ग्रा प च्या नामाप्र खुला प्रवर्गातून 02 उमेदवार,लिहिगाव ग्रा प च्या अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गातून 2 उमेदवार,कापसी(बु) सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून 2 उमेदवार, गादा ग्रा प च्या सर्वसाधारण खुला प्रवर्गातून 06 ,सोनेगाव ग्रा प च्या सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून 03 ,गुंमथी ग्रा प च्या सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून 03,आवंढी ग्रा प च्या अनुसूचित जाती खुला प्रवर्गातून 02,गुमथळा नामाप्र स्त्री प्रवर्गातून 03,तरोडी(बु) ग्रा प च्या सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून 03,परसाड ग्रा प च्या नामाप्र खुला प्रवर्गातून 03,जाखेगाव ग्रा प च्या नामाप्र स्त्री प्रवर्गातून 03,केम ग्रा प च्या सर्वसाधारण खुला प्रवर्गातून 02,दिघोरी ग्रा प च्या सर्वसाधारण खुला प्रवर्गातून 02,आडका ग्रा प च्या सर्वसाधारण खुला प्रवर्गातून 04 ,शिवणी ग्रा प च्या सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून 03,भुगाव ग्रा प च्या अनुसूचित जाती खुला प्रवर्गातून 04 तर वडोदा ग्रा प च्या सर्वसाधारण खुला प्रवर्गातून 06 उमेदवारासह 27 ग्रा प च्या 93 प्रभागातील 247 सदस्य पदासाठी 620 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.तर आजनी ग्रा प च्या अनुसूचित जमाती स्त्री व नागरिकांचा मागासवर्ग स्त्री प्रवर्गातील प्रत्येकी एका उमेदवारांच्या विरोधात दुसरे कुणीही प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने त्या दोन्ही महिला उमेदवार बिनविरोध निवडुन आल्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर येथे १९ डिसेंबर रोजी भाजपा प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष बैठक प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची माहिती

Sat Dec 17 , 2022
नागपूर :-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक १९ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे. बैठकीत विविध संघटनात्मक मुद्द्यांवर तसेच विद्यमान राजकीय स्थितीवर उपस्थितांना मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली. उपाध्ये यांनी सांगितले की, केंद्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!