– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. शुक्रवारी (ता. 24) रोजी उपद्रव शोध पथकाने 65 प्रकरणांची नोंद करून 44 हजार 8०० रुपयांचा दंड वसूल केला.
शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे (रु. २००/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 2१ प्रकरणांची नोंद करून 8 हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 1 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मॉल, उपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून ४ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करुन 1 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करुन 1 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वैद्किय व्यसायिकांनी बॉयोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कच-यात टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करुन 10 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावु/कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करुन 1 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रवांमध्ये (व्यक्ती) 18 प्रकरणांची नोंद करून 3 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून 7 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 2 प्रकरणांची नोंद
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे शुक्रवारी (ता.24) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत कृष्णा हार्डवेअर जुनी मंगळवारी व सतरंजीपुरा झोन अंतर्गत सोनकुसरे किराणा शॉप मस्कासाथ ईतवारी 2 प्रकरणाची नोंद करुन एकुण 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय लक्ष्मीनगर झोन अंतर्गत सेंट्रल पार्क रामदासपेठ कचरा रस्त्यालगत टाकल्याबाबत 5 हजार हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत दांडे हासपिटल रवि नगर चौक हासपिटलचा कचरा रस्त्यावर टाकलेल्याबाबत 10 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. संस्कृतिक सेलिब्रशन ढाबा कचरा रस्त्यालगत कचरा टाकण्याबाबत 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमान नगर झोन अंतर्गत विनोद सकोरे जयवंत नगर बांधकामाचा कचरा रस्त्यालगत टाकणेबाबत 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत उद्यान ग्लोरी हॉटेल नरेंद्र नगर परवानगी न घेता जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी ५ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 7 प्रकरणाची नोंद करून 45 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.