संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 2:- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 1 मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिनानिमित्त कामठी तहसील कार्यालय च्या प्रांगणात 1 मे ला सकाळी 8 वाजता विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी पोलीस विभागाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक नितीन पवार यांनी सलामी दिली.याप्रसंगी तहसीलदार अक्षय पोयाम, नायब तहसिलदार राजाराम बमनोटे, रणजित दुसावार,अमर हांडा,रघुनाथ उके, माजी आमदार देवराव रडके, पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे,माजी जी प सदस्य अनिल निधान, तहसील कार्यालयिन अधिकारी , कर्मचारी वृंद तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कामठी नगर परिषद कार्यालयात 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.याप्रसंगी उपमुख्य अधिकारी नितीन चव्हाण, कार्याध्यक्ष विजय मेथीयां,प्रदीप भोकरे,अमित खंडेलवाल, वीरेंद्र ढोके, ,आबासा मुंढे,राहुल बोकारे,निखिलेश वाडेकर, विजय सूर्यवंशी, रुपेश जैस्वाल, दर्शन गोंडाने,सचिन बिल्लरवान, दीपक जैस्वाल, धर्मेश जैस्वाल,विजय उज्जैनवार, सारिका परदेसी, अजय करिहार,जमिल अहमद , श्वेता हाडोती, माधुरी घोडेस्वार,अर्पणा, कल्याणी, संजय जैस्वाल, संजीव वाजपेयी, संजय भणारकर,सचिव प्रदीप जैस्वाल तसेच रुपेश जैस्वाल, विजय सूर्यवंशी, विनोद मेहरोलिया, संजय जैस्वाल, दर्शन गोंडाने, पुंडलीक राऊत, मसूद अख्तर, , रणजित माटे , आशिष राऊत, नरेश कलसे, आदि कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कामठी पंचायत समिती कार्यालयात बीडीओ अंशुजा गराटे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी सभापती उमेश रडके, कार्यालयिन अधिकारी, कर्मचारी वृंद उपस्थित होते.
नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे तर जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक राहुल शिरे यांच्या हस्ते पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुख्य उपस्थितीत धवाजरोहन करण्यात आले तर शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे वैद्यकीय अधीक्षक नयना धुपारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कामठी तालुक्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com