6 कोटींचा पाणीकर थकीत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचे नळ कनेक्शन कापणार!

कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत राहणाऱ्या नागरिकांकडून नगर परिषदला मिळत असलेल्या कर स्वरूपातून नगर परिषदचा आर्थिक कारभार सुरू असतो तर ही करवसुली नगर परिषद प्रशासनाची मुख्य आर्थिक स्रोत मानले जाते तर आर्थिक वर्षाचा शेवटचा मार्च एंडिंग महिना तोंडावर आला असूनही कित्येकाकडे कर वसुली थकीत आहे. तर थकीत कराचा आराखडा घेतला असता कामठी नगर परिषद हद्दीत एकूण 17 हजार 279 मालमत्ताधारक असून एकूण 1 कोटी 77 लक्ष रुपये थकीत कर असून यातील 90 लक्ष रुपयाची करवसुली करण्यात आली असून प्रॉपर्टी धारकाकडे 87 लक्ष रुपयाची थकबाकी कायम आहे तसेच नगर परिषद पाणीपुरवठा विभागाच्या या आर्थिक वर्षाच्या अखेरीस 14 हजार 450 नळजोडनी धारकाकडे 6 कोटी रुपयांचा जलकर थकीत आहे.यातील 1 कोटी 13 लक्ष रुपयाची जलकर वसुली करण्यात आली आहे. इतर नळजोडणी धारकाकडे थकबाकी अजूनही कायम आहे तेव्हा थकीत कराचा भरणा करून नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे अन्यथा नळजोडनी कापण्यात येईल असा ईशारा मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी दिला आहे.

कामठी नगर परिषदच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या महितीनुसार शहरात निवासी नळ जोडणी,व्यापारी नळ जोडणी असे एकूण 14 हजार 450 नळजोडनी धारक आहेत. माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या कार्यकाळात नगर परिषदच्या स्वतंत्र पाणीपुरवठ्याचे लोकार्पण करण्यात आले होते .त्यावेळी येरखेडा,रणाळा, आजनी, घोरपड सह लगतच्या कामठी कॅन्टोन्मेंट भागातील नागरी वसाहतीला तसेच विविध सैन्य कार्यालय,प्रशिक्षण केंद्रांना पाणीपूरवठा करण्याची जवाबदारी नगर परिषद पाणी पुरवठा विभागाची होती दरम्यान पाणीपुरवठा करीत असताना नगर परिषदला तारेवरची कसरत करावी लागत होती. बहुधा ठिकाणी पाणीपुरवठा योग्यरीत्या होत नसल्याने नगर परिषद पाणी पुरवठा विभागावीरोधात रोष निर्माण होत असे तसेच शहरातील बहुतेक ठिकाणी पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता त्यावेळी घरी नळ तरी पाण्याचा रड अशी स्थिती होती. यावर तोडगा काढत आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेत कामठी नगर परिषदद्वारे शहर वगळून इतर ठिकाणी करणारा पाणी पुरवठा बंद करून त्या ठिकाणी शासकीय निधीतून स्वतंत्र पाणी पुरवठा कार्यान्वित केली. आज नगर परिषद तर्फे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो .तर शहराला 24 तास शुद्ध पाणी मिळावे या उदार हेतूने उभारलेले तीन टंकी पाणी योजना ही नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितांमुळे पाणीटंकी बांधकाम रखडलेले आहे.

 – (मुख्यअधिकरी संदीप बोरकर)कामठी नगर परिषद वर महावितरण विभागाचे अडीच कोटी रुपयांची विद्दुत थकबाकी आहे .ही थकबाकी भरण्यास नगर परिषद प्रशासन असक्षम असल्याने विद्दुत विभागातर्फे नगर परिषद चा विद्दुत पुरवठा केव्हाही खंडित करण्यात येऊ शकतो ज्याला नाकारता येत नाही असे झाल्यास शहराला पाणीपुरवठा होणे शक्य होणार नाही,कारण विद्दुत पुरवठा खंडित झाल्यास पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही कामठी नगर पालिका कर वसुली अभावी मोठ्या आर्थिक संकटात आहे याची जाणीव घेत नागरिकानी विविध करापोटी थकीत रक्कम जमा करून सहकार्य करावे अन्यथा नाईलाजास्तव नगर परिषद प्रशासनाला सक्तवसुली करावी लागणार आहे .तेव्हा नागरिकानी थकीत कराचा भरणा करून थकीत कराचा भरणा करून नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बसपा ने गाडगेबाबा जयंती साजरी केली 

Thu Feb 23 , 2023
नागपूर :- राष्ट्रसंत प्रबोधनकार गाडगेबाबा यांची 147 वी जयंती बहुजन समाज पार्टीच्या वतीने मेडिकल चौक शेजारी असलेल्या गाडगे बाबा धर्मशाळेतील गाडगे बाबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश बसपा चे महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव रंजना ढोरे, पृथ्वीराज शेंडे, राजीव भांगे, नितीन शिंगाडे, विजयकुमार डहाट, मा प्रदेश सचिव उत्तम शेवडे, उत्तर प्रदेशातील माजी सांस्कृतिक मंत्री यशवंत निकोसे, जिल्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com