संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कन्हान : – श्री दंत्त मंदीर वार्ड क्र २ कांद्री येथील चौकसे मैदानातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ मित्र परिवार व आयुष ब्लँड बँक नागपुर यांच्या सयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करून शिबीरात ५८ युवक, युवती व महिलांनी रक्तदान करून श्री गणेशौत्सव साजरा करण्यात येत आहे.
बुधवार (दि.२७) सप्टेंबर २०२३ ला श्री दंत्त मंदीर वार्ड क्र २ कांद्री येथील चौकसे मैदानातील सार्वजनि क गणेश उत्सव मंडळ कांद्री मित्र परिवार व आयुष ब्लँड बँक नागपुर यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीराचे उदघाटन योगेश वाडीभस्मे, गजानन आकरे, रामभाऊ कटेर, राजहंस वंजारी, इंद्रपाल वंजारी यांच्या उपस्थित करण्यात आले. या शिबीरात एकुण ५८ युवक, युवती व महिलानी रक्तदान केले.
आयुष्य बॅल्ड बैंक चे डॉ. ठाकुर सर, स्विटी चौहान, करिश्मा लांजे, सुनल डाहाके, दुर्गेश कपारे यांनी रक्त दान संकलन केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता कार्तिक थोटे, आशिष वंजारी, दिपल राठोड, मूंकुद उंब्रजकर, इश्वर कामडे, गजानन पोटभरे, रोशन भोयर, गणेश किरपान, गणेश हटवार, रोहित वंजारी, मनोज बावनकुळे, आशिष विश्वकर्मा, मयंक उब्रजकर, तुषार सरोदे, सुधिर काळबांडे, शोभा आखरे, अर्चना राणे, विधा उंब्रजकर, विशाखा वंजारी, खूशबु राठोड सह समस्त गावकरी आणि सार्वजनिक गणेश मंडळ कांद्री चे सर्व पदाधिकारी, सदस्य आदी सहकार्य करित श्री गणेशोत्सव साजरा करित आहे.