– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मानले आभार
– रुग्णालयाच्या जागेवर नवीन ६१५ खाटांचे रुग्णालय उभारणार
नागपूर :- इंदोरा, नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र येथे नवीन पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रम आणि ६१५ खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून ५७५.७९ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मौलीक पुढाकारामुळे मिळालेल्या या यशाचा आनंदोत्सव आज शुक्रवारी (८ डिसेंबर) भारतीय जनता पार्टीतर्फे इंदोरा चौकामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रा. संजय भेंडे यांच्या अध्यक्षतेत छोटेखानी सभा देखील घेण्यात आली.
यावेळी शहर अध्यक्ष बंटी कुकडे, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम, माजी आमदार डॉ. मिलींद माने, गिरीश व्यास, उत्तर मंडल अध्यक्ष गणेश कानतोडे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सतीश शिरसवान, शहर महामंत्री संदीप गवई व विष्णू चांगदे, राजेश हाथिबेड, रमेश वानखेडे, शंकर मेश्राम, अविनाश धमगाये, नेताजी गजभिये, महेंद्र धनविजय, सुधीर जांभुळकर, महेंद्र प्रधान, इंद्रजीत वासनिक, मोहिनी रामटेके, चंदा रामटेके, किशोर बिहाडे, रवींद्र डोंगरे, मनीष मडके, संजय भगत, स्वप्नील भालेराव, आनंद अंबाडे, दिनेश इलमे, रुनाल चौहान, रामकृष्ण भिलकर, रोहित बघेल, संजय समुद्रे, जीवन तायडे, नितीन वाघमारे, रंजन बन्सोड, कैलास कोचे, सचिन चंदनखेडे, राजेश नंदेश्वर आदींसह मोठ्या संख्येत कार्येकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार डॉ. मिलींद माने यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर संस्थेशी संलग्नित डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र, नागपूर येथे नवीन पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रम व ६१५ खाटांचे रुग्णालय सुरु करण्यासाठी ५७५.७९ कोटी रुपये एवढ्या रक्कमेच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचे परिपत्रक राज्य शासनाद्वारे जारी करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रासाठी मागील अनेक दिवसांपासून शांततामय पद्धतीने आंदोलन करीत असलेल्या आंबेडकरी समाजबांधवांचे हे यश आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळापासून विषयाला केवळ प्रलंबित ठेवले जात असताना उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अगदी काही दिवसांपूर्वीच आंदोलकांना दिलेला शब्द पाळून तातडीने रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता मिळवून दिली. महाराष्ट्राचे माजी उर्जा मंत्री त्यातल्या त्यात उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत असलेले डॉ. नितीन राउत यांना सदर विषयाला साधा न्याय देखील मिळवून देता येउ नये, ही समाजासाठी शोकांतिका आहे.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी रुग्णालयाचा विषय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून समाजाची दिशाभूल केल्याबद्दल डॉ. नितीन राउत यांचेवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, समाजाचे प्रतिनिधी म्हणून जनतेने विधानसभेत जाण्याची संधी दिली. याउपर मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून देखील संधी मिळाली असतानाही डॉ. नितीन राउत यांनी समाजाच्या सर्व विषयांकडे, समस्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र हे त्यांच्याच मतदार संघात अगदी घराजवळ असतानाही तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून यासंदर्भात मान्यता मिळवून घेण्यात देखील डॉ. राउत यांना यश आले नाही आणि आज जेव्हा सत्तेतून पायउतार व्हावे लागले तेव्हा भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्याचे काम त्यांनी केले. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये अधिवेशनात तत्कालीन मा. राज्यपाल श्री. भगतसिंग कोशारी यांनी देखील त्यांच्या अभिभाषणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचा उल्लेख केला होता व हे केंद्र देशातील अनोखे केंद्र ठरणार असल्याचे नमूद केले होते. मात्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मा. राज्यपालांचे भाषण पूर्ण होउ दिले नाही व संपूर्ण विषयावरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राज्याचे उर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री असणा-या नितीन राउत यांनी देखील त्यांच्या मतदार संघातील सदर विषयावर उच्चारही काढला नाही, ही त्यांची दुटप्पी भूमिका आंबेडकरी समुदायांबाबत त्यांची भावना दर्शविणारी आहे. उलट देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि नागपूर शहराचे पूत्र म्हणून समाजाच्या समस्या, प्रश्नांना नेहमीच सामाजिक दायित्व म्हणून स्वीकारले आणि शक्य तेवढ्या लवकर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचेच फलीत आज इंदोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राला आज प्रशासकी मान्यता मिळाली आहे व ही संपूर्ण आंबेडकरी समुदायासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे, असेही ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.
यावेळी भाजपा उपाध्यक्ष प्रा. संजय भेंडे आणि माजी आमदार गिरीश व्यास यांनी देखील मत व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राला पदव्युत्तर महाविद्यालय व दवाखान्यात परावर्तित करून त्यासाठी आवश्यक निधी राज्यशासनाकडून तरतुद व वितरित करण्याबाबत ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते व त्यांच्याशी सदर विषयावर वैयक्तिकरित्या चर्चा करून विनंती देखील केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण विषयाची सविस्तर माहिती घेत त्यासंदर्भातील अडचणी जाणून घेतल्या व संपूर्ण समाधानानंतर यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे देखील आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी यासंदर्भात तातडीने निर्णय घेउन आंबेडकरी समुदायाला मोठा दिलासा मिळवून देणारा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाबद्दल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.