– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची केली जात आहे.
मनपाच्या दहाही झोन अंतर्गत रविवारी (ता: ४) व सोमवार (ता:५) रोजी उपद्रव शोध पथकाने ५७ प्रकरणांची नोंद करून ३९,१०० रुपयाचा दंड वसूल केला. यात हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत १७ प्रकरणांची नोंद करून ६८०० रुपयांची वसुली करण्यात आली.
कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत ६ प्रकरणांची नोंद करून ६०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत ०४ प्रकरणांची नोंद करून १६०० रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून २००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०३ प्रकरणांची नोंद करून ३५०० रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशोप, गराज व इतर दुरुस्तीचे व्यवसायिकांने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास १३ प्रकरणांची नोंद करून २६०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ११ प्रकरणांची नोंद करून ११००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. हरित लवाद यांनी दिलेल्या दि. 03.07.2017 च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
उपद्रव शोध पथकाद्वारे ३ किलो प्लास्टिक जप्त
उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगणाऱ्यावर ३ प्रकरणाची नोंद करून १५००० रुपये दंड वसूल करण्यात आला., यात एकूण ३.२०० किलो प्लास्टिक जप्त केला आहे. याशिवाय उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत खरे टाऊन येथील सचिन गोडबोले यांच्या विरुद्ध उरलेले अन्न नाल्यात फेकून चेम्बर लाईन चोक केल्या बद्दल कारवाई करून १०, ००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.