सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 52 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (27) रोजी शोध पथकाने 52 प्रकरणांची नोंद करून 31,000/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 2,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 200/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 400/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 3,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/ साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 23 प्रकरणांची नोंद करून 4,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 12 प्रकरणांची नोंद करून 12,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. शाहुकार इन्फ्रा यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत मे.प्रकाश पराठे यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. मॅजिक मोटर्स यांनी कचरा पेटवल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे.श्री डेअरी यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे.अग्रवाल किराणा यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोन अंतर्गत मे. हीमालय लॉन यांनी चेंबर ब्लॉक केल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू. 35,000/- दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दहाही झोनमध्ये भव्य स्वच्छता मोहिम रविवारी

Sat Sep 28 , 2024
– सामाजिक संस्थांच्या सहकार्याने श्रमदान नागपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याची पूर्वतयारी म्हणून १७ सप्टेंबर २०२४ ते ०१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. याअंतर्गत रविवारी २९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजता सर्व दहाही झोनमध्ये भव्य स्वच्छता अभियान (श्रम दान) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!