संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– माजी नगरसेविका संध्या रायबोले यांना यश
कामठी :-नगर परिषद कार्यालय प्रांगणात आयोजित कार्यक्रमात प्रभाग 15 च्या एकून 480 लाभाथ्याना भाजपा प्रदेशाध्यक्ष पुर्व पालकमंत्री आ चंद्रशेखर बावनकुले यांच्या शुभहस्ते मालकी हक्क पट्टे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले
यावेळी रामटेक लोकसभा क्षेत्रा चे खासदार कृपाल तुमाने, कामठी विधानसभा क्षेत्र चे आ टेकचंद सावरकर,भाजपा उद्योग -व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रदेश सदस्य अजय अग्रवाल,नागपुर सुधार प्रन्यासचे विश्वस्त संदीप ईटकेलवार,भाजपा नागपुर जिला महामंत्री अनिल निधान,भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया, उपविभागीय अधिकारी मलिक विरानी, तहसीलदार अक्षय पोयाम,भुमी अभिलेख कार्यालय अधीक्षक नामदेव पेंढे,मुख्याधिकारी संदीप बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गौतम नगर रहीवासी विनोद चांदोरकर यांना प्रतिनिधिक स्वरूपात मालकी हक्क पट्टा प्रमाणपत्र देण्यात आले प्रभागा च्या माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी सांगितले की , विगत नगर परिषद निवडणुकीत येथील भूखंडावरील औद्योगिक आरक्षण काढून मालकी हक्काचे पट्टे देण्याची मुख्य मागणी होती पुर्व पालकमंत्री बावनकुले यांनी दोन्ही मागण्या पुर्ण केल्या, उर्वरित नागरिकांना कागदोपत्री पुर्तता झाल्या नंतर मालकी हक्क पट्टे वितरित करण्यात येतील,निवडणुकीतील आश्वासनाची वचन पुर्ती केल्या बद्द्ल प्रभाग 15 च्या स्थानिक नागरिकांनी माजी पालकमंत्री आ बावनकुले, माजी नगरसेविका रायबोले यांचे आभार मानले.