संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 4 – दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवा निमित्त आजनी येथील नवयुवक युवा मंडळ आणि गावातील सर्व मंडळ, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून रविवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४३ दात्यांनी रक्तदान करून सेवा दिली.
या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार श्री देवरावजी रडके यांच्या हस्ते झाले. यावेळी स्व रक्तदाता रामचंद्रजी देवतळे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भगवंतराव रडके, उमेश भाऊ रडके, डोमाजी पाटील, विनोद वाट, बळवंतराव नेऊलकर, कृष्णा दवंडे, मोतीराम इंगोले, गजानन घोडे, तुषार रडके, सुनील विघे, अनिकेत इंगोले, सूर्यभान हेटे, शेषराव बोंबाटे, प्रफुल्ल घोडे, धर्मराज हेटे, दिनेश बडगे, आकाश देवतळे, कामरान आदींची उपस्थिती होती.
नवयुवक मंडळाचे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे हे सातवे वर्ष असून या शिबिराच्या यशस्वीतेसाठी नवयुवक युवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते, लिलाधर दवंडे, राजकुमार दवंडे, अभिषेक फुकट, अनुराग रडके, शिवपाल वाट, वृषभ हेटे, रितेश उकेबोंद्रे, अंकित जेवडे, गजेंद्र वाट, दर्पण घोडे, पियूष घोडे, ऋषिकेश भोयर, अमित,सुमित, सचिन ढोले, महेंद्र मिरासे, राजेश वांढरे, मेघराज दवंडे, विजय वानखेडे, शुभम वाणी, आशिष सोनेकर, नितीन पारेकर, अमोल सोनटक्के, राहुल दवंडे, अविनाश मेश्राम, अनिकेत हेटे, कमलेश ठाकरे, अभिजित लोहकरे, अविनाश पारेकर, निखिल नेऊलकर, ज्ञानेश्वर रहांगडाले, निखिल वीघे, मपित कोठाडे, दीपक नारनवरे, धर्मराज वाणी, शिव नाईक, अमोल गजभिये, अभिषेक दवंडे, देवांशू खेवले, मोहित जांभुळे, तन्मय वाणी, अंशुल भोयर आदींनी सहकार्य केले. रक्त संकलन तिरपुडे ब्लड बँकेने केले.