– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (5) रोजी शोध पथकाने 42 प्रकरणांची नोंद करून रु. 51,900/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत 24 प्रकरणांची नोंद करून रु.9,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु.200/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु.1,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून रु.11,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. वैद्यकिय व्यवसायिकांना बायोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 10,000 रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे व साठवणे टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु.6,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 17 प्रकरणांची नोंद करून रु.3,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 8 प्रकरणांची नोंद करून रु.8,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. अमृत सावजी भोजनालय यांनी मोठ्या प्रमाणात कचरा अन्नपदार्थ टाकून चेंबरमध्ये अडथळा निर्माण करण्याबाबत रु. 15,000/- चे दंड व घरकुल इनफ्रा यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत श्री पॅथलोजी यांनी सामान्य कचऱ्या सह जैववैद्यकीय कचरा सापडलाबद्दलरु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले व राजेश & ब्रदर्स यांनी कचरा पॅकेजिंग साहित्य रस्त्याच्या कडेला टाकल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत विनायक कुराडे यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधीबाग झोन अतंर्गत धरमेश स्वीट्स यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अतंर्गत अचिव्हर्स लर्ननिंग सेंर्ट यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. लकडगंज झोन अतंर्गत स्कायलाईन इनफ्रा यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु.10, 000/- चे दंड वसुल करण्यात आला. आशीनगर झोन अतंर्गत न्यू एरा मोटर्स यांनी पाईपलाईन बसवल्यामुळे सर्व्हिस रोडचे नुकसान केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. मंगळवारी झोन अतंर्गत के.एम.सी कनस्ट्रकश्न्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 10 प्रकरणांची नोंद करून रू. 80,000/- दंड वसूल केला.