‘आयरास्ते’च्या उपकरणामुळे ४१ टक्के अपघात कमी, चालकांना ड्रायव्हर सेफ्टी अवार्ड

– नागरिकांना प्रथमोपचार प्रशिक्षण

नागपूर :- नागपूर शहरातील सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसंदर्भात ‘आयरास्ते’ (Intelligent Solutions for Road Safety through Technology & Engineering) या केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या प्रकल्पाचे परिणाम दिसू लागले आहेत. या प्रकल्पाअंतर्गत शहरातील २५० बसेसमध्ये उपकरण लावण्यात आले. हे उपकरण लावलेल्या बसेसच्या अपघातांचे प्रमाण ४१ टक्के कमी झाल्याचा अहवाल बुधवारी (ता.१०) मनपा अतिरिक्त आयुक्त  आंचल गोयल यांच्यापुढे ‘आयरास्ते’द्वारे सादर करण्यात आला.

अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेत छत्रपती शिवाजी महाराज मनपा प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षात ‘आयरास्ते’च्या संदर्भात आढावा बैठक पार पडली. बैठकीत मुख्य अभियंता राजीव गायकवाड, कार्यकारी अभियंता (वाहतूक) रवींद्र बुंधाडे, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, वाहतूक पोलिस अधिकारी, आयरास्ते प्रकल्पातर्फे सीएसआयआर-सीआरआरआय नवी दिल्लीचे चिफ सायन्टिस्ट डॉ. कायथ्स रवींद्र, INAI चे सीईओ वर्मा कोनाला (Varma S. Konala), इनाइ (INAI) इंटेल चे प्रधान सचिव डॉ. अंबूमनी सुब्रमण्यन (Anbu Mani Subramanian), इनाइ चे गोविंद क्रिष्णन, आयएनएएसचे मनोज मुरकुटे आदी उपस्थित होते.

रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने ‘आयरास्ते’ द्वारे उपकरण विकसीत करण्यात आले आहे. हे उपकरण नागपूर शहरातील आपली बस, स्कूल बस व इतर अशा एकूण २५० बसेसमध्ये लावण्यात आले आहेत. हे उपकरण लावल्यानंतर चालकांनी रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहन कसे चालवावे व काय काळजी घ्यावी यासंदर्भात चालकांना प्रशिक्षण देखील देण्यात आले. यात त्यांच्या प्रोत्साहनासाठी १५० चालकांना ‘चॅम्पियन सेफ्टी अवार्ड’ प्रदान करून गौरविण्यात आले. आयरास्तेच्या उपकरणामुळे बसेसच्या अपघाताचे प्रमाण ४१ टक्क्यांनी कमी झाले तर दुर्घटनेत मृत्यूचे प्रमाण देखील ४० टक्के कमी झाल्याचे निरीक्षण ‘आयरास्ते’च्या अधिका-यांनी बैठकीत नोंदविले.

यावेळी नागपूर शहरातील ब्लॅक स्पॉट आणि ग्रे स्पॉटची माहिती देण्यात आली. ज्या भागावर सतत अपघात होतात, जिथे अपघात होण्याची जास्त शक्यता आहे, जिथे अनेक अपघातांमध्ये अनेकांचा जीव गेलेला आहे असे नागपूर शहरात मनपा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य महामार्ग प्राधिकरण यांच्या अंतर्गत येणारी ३८ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आलेली आहेत. शहरातील संपूर्ण ब्लॅक स्पॉटवर सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने काम सुरू करण्यात आलेले आहे. याशिवाय ज्या रस्त्यांवर अपघाताची शक्यता आहे, जिथे अंमलबजावणी केल्यास अपघात टाळता येईल अशी संभाव्य अपघातप्रवण स्थळे अर्थात ग्रे स्पॉटची सुद्धा यावेळी माहिती देण्यात आली. नागपूर शहरात २० नवीन ग्रे स्पॉट निश्चित करण्यात आले. हे ग्रे स्पॉट सुरक्षित करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू आहेत. ‘आयरास्ते’द्वारे शहरात ‘ट्राय स्टँडर्ड सेल’ तयार करण्यात आले असून अपघातप्रवण अर्थात ब्लॅक व ग्रे स्पॉट च्या नजीकची दुकाने, चहाठेले व इतर नागरिकांना प्रथमोपचार किट हाताळणी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आतापर्यंत ३१ अपघातग्रस्तांवर उपचार करण्यात आले.

आयरास्ते द्वारे शहरात सुरू असलेल्या कार्याबाबत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी समाधान व्यक्त करीत त्यांच्या कार्याची प्रसंशा केली. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहन चालक आणि सामान्य नागरिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असल्याचे मत अतिरिक्त आयुक्तांनी व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा आशीनगर झोनमध्ये आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन

Thu Jan 11 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या आशीनगर झोन कार्यालयामध्ये आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, मुख्य स्वच्छता अधिकारी सुनिल तांबे, माजी नगरसेवक मनोज सांगोळे, खुशिराम रामटेक्कर, रोशन जांभुळकर, सतिश खरे, अंतकला मेश्राम, सुनंदा बोदिले, शशी फुलझेले, श्रीकांत गेडाम,करिश्मा गजभिये आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांनी आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com