नागपुरात मेट्रोचे 40 किलोमीटरचे जाळे, तर 2027 पर्यंत 43 किमीचा दुसरा टप्पा पूर्ण होणार – खासदार कृपाल तुमाने यांचा लोकसभेत तारांकित प्रश्न

नागपूर :- देशात सुमारे ९०५ किमी लांबीचे मेट्रो रेल्वेचे जाळे कार्यरत आहे. तर महाराष्ट्रात मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांत मेट्रो रेल्वेचा विस्तार होत आहे. त्यात विशेषता: नागपूर शहरात आतापर्यंत 40 किलोमीटरचे मेट्रो रेल्वेचे जाळे तयार झाले असून मेट्रोचा दुसरा टप्पा डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी लोकसभेत दिली. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

खासदार कृपाल तुमाने यांनी, सध्या देशात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या लांबीचे (किलोमीटर) राज्यवार तपशील काय आहेत, राज्य/केंद्रशासित प्रदेश, ब्लॉक आणि शहर-निहाय तपशील आणि विलंबाची कारणे आणि प्रलंबित प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता किती वेळ आहे, परिचालित आणि मंजूर मेट्रो रेल्वे विभाग, विभाग आणि शहराच्या संदर्भात झालेली प्रगती तसेच ते केव्हा पूर्ण होण्याची आणि कार्यान्वित होण्याची शक्यता आहे? असे तारांकित प्रश्न केंद्रीय मंत्री हरदिपसिंह पुरी यांना विचारले होते.

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदिपसिंह पुरी उत्तर देताना म्हणाले, मेट्रो रेल धोरण, 2017 नुसार, केंद्र सरकार जेव्हा जेव्हा संबंधित राज्य सरकारकडून प्रस्ताव सादर केला जातो, तेव्हा प्रस्तावाची व्यवहार्यता आणि संसाधनांची उपलब्धता यावर अवलंबून शहरे किंवा शहरी भागातील मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावांसाठी आर्थिक मदतीचा विचार करते. सध्या देशात सुमारे ९०५ किमी लांबीचे मेट्रो रेल्वेचे जाळे कार्यरत आहे. महाराष्ट्रात मुंबईत 77 किमी, नागपूर 40 किमी आणि पुणे शहरात 24 किमी असे एकुण 141 किमीचे मेट्रोचे जाळे आहे. तसेच पुणे शहरासाठी हिंजेवाडी ते शिवाजीनगर 23 किलोमीटरचा मेट्रो टप्पा – 3 स्वीकृत करण्यात आला आहे. त्यासाठी 8 हजार 313 करोड रूपयांचा खर्च आहे. नागपूर शहरातील मेट्रोचा दुसरा टप्पा – मिहान ते एमआयडी सीईएसआर, ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी, लोकमान्य नगर ते हिंगणा, प्रजापती नगर ते ट्रांसपोर्ट नगर एकुण 43.80 किमीचे जाळे आहे. त्यासाठी 6708 करोड रूपयांची तरतूद असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रेम नगर से निकली साईं गजानन शोभायात्रा

Thu Dec 21 , 2023
– श्री हनुमान देवस्थान मन्दिर पंच कमेटी का आयोजन नागपुर :- श्री हनुमान देवस्थान मंदिर पंच कमेटी, प्रेम नगर का हीरक महोत्सव धूमधाम से इस वर्ष 28 दिसंबर तक मनाया जा रहा है। हीरक महोत्सव अंतर्गत श्री साईं गजानन महाराज सप्ताह का आयोजन मंदिर परिसर में किया गया है। सप्ताह के अंतर्गत प्रेम नगर से भव्य शोभा यात्रा का आयोजन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com