वाडी येथे 4 हजार 570 किलो प्लास्टीकच्या कॅरीबॅग व इतर साहित्य जिल्हा प्रशासनाने केले जप्त

– पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या कॅरीबॅग ऐवजी कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन 

नागपूर :- पर्यावरणाला घातक असणाऱ्या प्लास्टीक कॅरीबॅग व इतर पिशव्यांचा सूमारे 4 हजार 570 किलो एवढा साठा जिल्हा प्रशासनाने वाडी येथे आज दिनांक 21 जून रोजी दुपारी 4.30 वाजता धाड टाकून जप्त केला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, वाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय देशमुख तहसीलदार बाळासाहेब टेळे व पोलीस अधिकारी या कारवाईत सहभागी होते. देविका ट्रान्सपोर्ट, कन्ट्रोल वाडी व अभिनव लॉजेस्टीक अमरावती रोड, वाडी येथे हा साठा होता. जप्त केलेला साठा सिंगल युज प्लास्टीक प्रकारात मोडणारा असून शासनाने त्यावर बंदी घातलेली आहे.

पर्यावरणाला यापासून मोठ्या प्रमाणात आव्हान निर्माण झाल्यामुळे वेळोवेळी नागरिकांना कॅरीबॅग ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे वेळोवेळी आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत केले जात आहे. तथापि यावर बंदी असूनही सिंगल युज कॅरीबॅगचा बाजारपेठेत वापर होत असल्याचे आढळून आल्याने या कारवाईने कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. संबंधित साठवणूक करणाऱ्यांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यापूढे कारवाई अधिक मोठ्या प्रमाणात वाढवू असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कापूस सोयाबीन हमीभाव घोषणा-पंडी सरकारने महाराष्ट्राच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तोडांला पाने पुसली - किशोर तिवारी

Sat Jun 22 , 2024
नागपूर :- मागील लोकसभा निवडणुकीत कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी भाजपला विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात सरसकट नाकारल्यानंतर भाजपा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात आर्थीक अडचणीत असलेले शेतकरी विक्रमी आत्महत्या करीत असतांना येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातील मोदी सरकार विरुद्धचा रोष कमी होण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा या फार्म्युल्याने यावर्षी केंद्र सरकार १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com