नवेगाव-खैरी पम्पिंग स्टेशन येथे ४ तासांचे विद्युत शटडाऊन १२ जुलै ला

– 70% नागपूरचा पाणीपुरवठा १२ जुलै ला राहणार बाधित…..

नागपूर :-  MSEDCL यांनी मनसर -पारशिवनी सब-स्टेशन  वरून येणाऱ्या ३३KV मुख्य विद्युत वाहिनीवर मोठा बिघाड वाचविण्यासाठी तसेच काही देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी नवेगाव खैरी येथील कच्च्या पाण्याचा (raw  water ) चा पुरवठा करणाऱ्या पम्पिंग स्टेशन वर ४ तासांचे पॉवर शटडाऊन येत्या १२ जुलै २०२३ (बुधवारी ) घेण्याचे ठरविले आहे . ह्या ४ तासांच्या पॉवर शटडाऊन (सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत) मुळे नागपूर महानगरपालिकेच्या नवेगाव खैरी पम्पिंग स्टेशन चा वीजप्रवाह खंडित होईल  आणि पम्पिंग स्टेशन  केंद्रावरून  नागपुरातील गोरेवाडा येथील पेंच-१जलशुद्धीकरण केंद्र , पेंच-२ जलशुद्धीकरण केंद्र   आणि  पेंच- ३ जलशुद्धीकरण केंद्र तसेच गोधनी स्थित पेंच-४ ह्या जलशुद्धीकरण केंद्रातून  कच्च्या पाण्याचे पम्पिंग खंडित होणार आहे.

आपल्या माहितीकरिता नागपूर महानगर पालिकेच्या नवेगाव खैरी पम्पिंग स्टेशन वरून  नागपूर शहरातील  गोरेवाडा स्थित पेंच-१, पेंच २, पेंच-३  जलशुद्धीकरण केंद्र आणि गोरेवाडा तलाव  तसेच गोधणी स्थित पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र येथे कच्च्या पाण्याचा (raw  water ) चा पुरवठा शुद्धीकरण करण्याकरिता केल्या जातो .

ह्या  पॉवर शटडाऊनमुळे नागपूर शहरातील  गोरेवाडा स्थित पेंच-१, पेंच २, पेंच-३  जलशुद्धीकरण केंद्र आणि गोधणी स्थित पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र वरून पाणीपुरवठा होणाऱ्या नागपूरचा पाणीपुरवठा येत्या १२ जुलै २०२३ (बुधवारी ) रोजी बाधित राहण्याची शक्यता आहे .

नवेगाव खैरी पॉवर शटडाऊन:  १२ जुलै २०२३ (बुधवारी ) पाणीपुरवठा बाधित राहणारे जलकुंभ:

*पेंच -१ जलशुद्धीकरण केंद्र :* मेडिकल फीडर (गांधीबाग झोन ), बर्डी फीडर  (धरमपेठ झोन), छावणी  जलवाहिनी, राजभवन जलवाहिनी, इटारसी  जलवाहिनी , सदर  फीडर  आणि गोरेवाडा जलकुंभ (मंगळवारी झोन) बोरियापुरा  फीडर लाईन  (सतरंजीपुरा झोन), वंजारी नगर ओल्ड लाईन , वंजारी नगर नव लाईन, हनुमान नगर आणि रेशीमबाग  (धंतोली झोन)

पाणीपुरवठा भाग पेंच २ आणि ३ जलशुद्धीकरण केंद्र: लक्ष्मी नगर झोन ( गायत्री नगर जलकुंभ, प्रताप नगर जलकुंभ, खामला जलकुंभ, लक्ष्मी नगर जुने जलकुंभ, टाकली सिम जलकुंभ,जयताळा  जलकुंभ, त्रिमूर्ती नगर जलकुंभ , धरमपेठ झोन ( राम नगर जलकुंभ, सेमिनरी हिल्स  नवीन जलकुंभ, सेमिनरी हिल्स जुने जलकुंभ , सिविल लाईन  DT , दाभा जलकुंभ, टेकडी वाडी जलकुंभ, रायफल लाईन, फुटाला लाईन, , हनुमान नगर  झोन (चिंचभवन जलकुंभ , ) मंगळवारी  झोन (गिट्टीखदान  जलकुंभ ), गांधीबाग झोन (बोरियापुर/खदान  जलकुंभ, किल्ला महाल जलकुंभ  आणि सीताबर्डी फोर्ट १ आणि फोर्ट २ जलकुंभ)

गोधनी पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र : नारा  जलकुंभ, नारी/ जरीपटका जलकुंभ (आशी नगर झोन), धंतोली जलकुंभ (धरमपेठ झोन), लक्ष्मी नगर जलकुंभ (लक्ष्मी नगर झोन), नालंदा नगर, श्री नगर, ओंकार नगर १ आणि २ जलकुंभ, म्हाळगी नगर  जलकुंभ (हनुमान नगर झोन), हुडकेश्वर आणि नरसाळा ग्रामीण चा पाणीपुरवठा , सक्करदरा १, २ आणि ३ जलकुंभ  (नेहरू नगर  झोन)

मनपा-OCW यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. या काळात टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नाही. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे  सहकार्य करावे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

१५ जुलैपासुन " सुंदर माझे उद्यान व ओपन स्पेस " स्पर्धा  

Tue Jul 11 , 2023
– स्पर्धेत ५२ हुन अधिक संघ होणार सहभागी चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकच लक्ष शहर स्वच्छ मोहीमेअंतर्गत शहरातील नागरिकांचे आपल्या शहराच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणात योगदान असावे या दृष्टीने ” सुंदर माझे उद्यान ” व ” सुदंर माझी ओपन स्पेस ” या २ स्वतंत्र स्पर्धा १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com