संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 30:-कामठी चे शासकीय उपजिल्हा रुग्णालय म्हटले की वादग्रस्त चर्चेला उधाण येते.मात्र हेच शासकीय उपजिल्हा रुग्णालय या वादग्रस्त चर्चेला विराम देत असून मागील एक वर्षात एकूण 1154 प्रसूती केली असून ज्यामध्ये 384 हे सिझेरियन प्रसूती निशुल्क पद्धतीने केल्या आहेत तसेच 770 ह्या नॉर्मल प्रसूती ह्या निशुल्क पद्धतीने केल्या आहेत.
शासकीय योजना प्रामाणिकपणे राबविले तर सर्वसामान्य नागरिकांना लाभ होतो .काम करण्यासाठी मानसिकता ठेवली तर रुग्ण सेवा करता येत असल्याचे मत वैद्यकिय अधीक्षक डॉ धुपारे यांनी व्यक्त केले.
ग्रामीण रुग्णालयात मागील एक वर्षात 384 निशुल्क सिझेरियन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com