संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नवरात्रोत्सव निमित्त न्यू कामठी येथील शिव छत्रपती नगर येथे नवचैतन्य दुर्गा उत्सव मंडळ कामठी च्या वतीने काल 6 नोव्हेंबर ला आयोजित भव्य रक्तदान शिबिरात 38 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करीत ‘मातृ वंदन करिता रक्तदान शिबिर ,मी रक्तदान केले ,आपण पण करा गरजूला मदत होईल असा संदेश दिला.रक्तदान शिबीर यशस्वी रित्या पार पडला असून या रक्तदान शिबिरात लाईफ लाईन ब्लड सेंटर च्या चमूने विशेष आरोग्य सेवा पुरवून रक्तसंकलन केले.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे शालू रंधई, रमा सातपुते,पल्लवी उके,वैशाली कांबळे, सुषमा कुंभलकर, पुजा पडोळे, रक्तदाता बाबुला वाघमारे, क्रिष्णा भाजीपाले, हर्षल रंधई, सागर बिश्वास यासह 38 रक्तदात्यांनी मोलाची भूमिका साकारली.