यवतमाळ :- जिल्ह्यातील 334 आपले सरकार सेवा केंद्र विविध कारणाने कायमस्वरूपी बंद करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी संबंधित केंद्र चालकांना नोटीस बजावून खुलासे मागविण्यात आले आहे.
नागरिकांना सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यास देण्यात येते. सदर 334 केंद्र विविध कारणाने कायमस्वरूपी बंद करण्याचे प्रस्तावित आहे. या केंद्रांची यादी व नोटीस www.yavatmal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यादीतील केंद्र चालकांनी दि.१२ ऑगस्ट ते दि.२२ ऑगस्ट पर्यंत आपले अंतीम लेखी म्हणणे नवीन प्रशासकीय इमारत, २ रा माळा, ई-गव्हर्नस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे सादर करावयाचे आहे.
केंद्र चालकांनी लेखी म्हणणे सादर न केल्यास आपणास काहीही म्हणायचे नाही, असे गृहीत धरून आपले सरकार सेवा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील, याची सर्व संबंधित आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी नोंद, दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.