महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)
• विकेंड डिस्काउंट या शनिवार पासून सुरु होणार
• मेट्रो प्रवास आता अधिक स्वस्त
नागपूर : नुकतेच मेट्रो प्रवाशांसाठी डेली पासची सुविधा उपलब्ध केल्यानंतर, महा मेट्रो नागपूर आता आणखी एक सुविधा मेट्रो प्रवाश्याना देत आहे. येत्या शनिवार पासून सर्व मेट्रो प्रवाश्याना मेट्रो प्रवासाच्या तिकिटावर 30% `वीकेंड डिस्काउंट’ देणार आहे. या सुविधेची सवलत फक्त शनिवार आणि रविवारी या दिवशी लागू होईल.
नवीन धोरणानुसार, तिकिटां व्यतिरिक्त प्रवासासाठी महा कार्ड वापरणारे प्रवासीही या सवलतीसाठी पात्र असतील. प्रत्येक व्यवहार हा रोखीने किंवा महा कार्डद्वारे – जो शनिवार आणि रविवारी केला जातो तो सामान्य भाड्याच्या तुलनेंत 30% दराने सवलत असेल. कार्डवर कोणत्याही प्रकारचे विशेष पास लोड न करता प्रवासी त्यांचे विद्यमान महाकार्ड थेट स्वयंचलित गेट्सवर वापरू शकतात.
उल्लेखनीय आहे कि, महा मेट्रो सर्व श्रेणीतील विद्यार्थ्यांना पदवी स्तरापर्यंत 30% सवलत प्रदान करत आहे . या सवलतीचा लाभ विविध आयटीआय किंवा डिप्लोमा अभ्यासक्रम करणाऱ्यांनाही मिळू शकतो. याशिवाय नागपूर मेट्रोने अलीकडेच प्रवाशांसाठी डेली पासची सुविधा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, एक प्रवाशी 100 रुपये मध्ये डेली पास खरेदी करू शकतो आणि कोणत्याही दिवशी नागपूर मेट्रो प्रकल्पात अमर्यादित प्रवास करू शकतो.
विकेंड डिस्काउंट ही संकल्पना प्रवाशांना या दोन दिवसांत खरेदी, फिरण्याकरिता आणि इतर कारणांसाठी खूप कमी किमतीत प्रवास करता यावा यासाठी सुरू करण्यात आली आहे. वाढते तापमान बघता मेट्रो वातानुकूलित गाड्यांमध्ये आरामदायी प्रवास प्रदान करते जे कि प्रवाशांसाठी फायदेशीर ठरेल.
महा मेट्रो नागरिकांना या ‘वीकेंड डिस्काउंट’चा लाभ घ्यावा व शनिवार आणि रविवार या दिवशी मोठ्या संख्येने प्रवास करावा, असे आवाहन करत आहे.