संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– माजी नगरसेविका संध्या रायबोले यांचा पुढाकार
कामठी :- गत वर्षी जुले महिन्यात झालेल्या मूसळाधार पावसा मुळे प्रभाग 15 तील रहिवासी सैलाब नगर निवासी अरविंद राधेश्याम माने आणि रमानगर निवासी लक्ष्मीबाई श्रीराम तांडेकर यांचे घर पुर्णता पडले होते, स्थानीय माजी नगरसेविका संध्या रायबोले यांच्या पाठपुराव्या मुळे शासन नियमा नुसार महसूल विभाग द्वारा पंचनामा करुन प्रत्येकी 1 लाख 50 हजार चे सानुग्रह अनुदान “नैसर्गीक आपत्ती नुकसान भरपाई अनुदान” अंतर्गत नुकतेच प्रदान करण्यात आले.
सैलाब नगर निवासी अरविंद राधेश्याम माने आणि रमानगर निवासी लक्ष्मीबाई श्रीराम तांडेकर यांना या बाबतचे पत्र भाजपाच्या माजी नगरसेविका संध्या उज्वल रायबोले यांनी सोपविले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशा वरून तहसीलदार अक्षय पोयाम,मुख्याधिकारी संदीप बोरकर, तलाठी संदीप कांबले, नगर रचनाकार विक्रम चव्हान,कर निरीक्षक आबासो मुडे, प्रदीप भोकरे यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले,यावेळी रोहित दहाट, शंकर चवरे,विकास कठाने, दिनेश खेडकर,अरविंद चवडे,विक्की बोंबले उपस्थित होते .
-सोबतच रामगढ़, आनंद नगर, शिव नगर, विक्तु बाबा नगर येथील अंशता नुकसान झालेल्या आपदग्रस्ताना प्रत्येकी 5 हजार चे सानुग्रह अनुदान देण्यात आले, सर्व अनुदान डिबिटी मार्फत थेट लाभार्थीच्या बैंक खात्यात जमा करण्यात आले आहेत
– संध्या उज्वल रायबोले, माजी नगरसेविका प्रभाग 15 कामठी