२ दिवसांत आणखी २६ नळ जोडणी कपात, आतापर्यंत ८६ थकबाकीदारांवर कारवाई

चंद्रपूर – पाणीपट्टी कराचा भरणा न करणार्‍या ८६ लाभधारकांची नळ जोडणी चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे बंद करण्यात आली असुन कराचा भरणा त्वरीत करा अन्यथा नळ कपातीस तयार राहण्याचा संदेश मनपाद्वारे देण्यात येत आहे. यापुर्वी ६५ व या २ दिवसात २६ अश्या एकुण ८६ थकबाकीदारांवर नळ कपातीची कारवाई करण्यात आली आहे.

पाणीकराची करवसुली मोठ्या प्रमाणात थकीत असल्याने मनपातर्फे करवसुली मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. पाणीपट्टी कर वसुलीसाठी मनपाद्वारे १२ पथके गठीत करण्यात आली असुन आर्थिक वर्ष २०२२-२३ करीता रू. १२.९७ कोटी थकीत मागणी व रू. ०५.४५ कोटी चालू मागणी अशी एकूण रू. १८.४३ कोटी पाणीपट्टी कराची वसुली थकीत आहे.

यापुर्वी शहरातील नळधारकांनी थकीत कराचा भरणा करावा यासाठी महानगरपालिकेमार्फत सूट देण्यात आली होती. याअंतर्गत ३१ ऑक्टोबर पर्यंत कराचा एकमुस्ता भरणा केल्यास १० टक्के तर ०१/११/२०२२ ते ३१/१२/२०२२ पर्यंत पाणी कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी ५ % सुट देण्यात आली होती. यापुढे मनपातर्फे कुठलीही सुट मिळणार नसल्याने त्वरीत कराचा भरणा करावा अन्यथा कारवाईस सामोरे जाण्याचा इशारा मनपातर्फे देण्यात येत आहे.

मनपाचे ५१ अधिकारी – कर्मचारी यांची १२ पथके सुटीच्या दिवशीही कार्यरत असुन थकबाकी वसुली तसेच थकबाकी न भरल्यास नळ जोडणी कपात करण्याची कारवाई केली जात आहे. नळधारकांनी थकीत कराचा भरणा प्रियदर्शिनी चौक पाणी टाकी येथील मनपाचे पाणी पुरवठा कार्यालय, झोन कार्यालय क्रमांक १- संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स, झोन कार्यालय क्रमांक २- कस्तुरबा भवन सात मजली इमारत गांधी चौक, झोन कार्यालय क्रमांक ३- देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा बंगाली कॅम्प येथे करावा तसेच www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर सुद्धा पाणीपट्टी कराचा भरणा करता येणे शक्य आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हो जी! या तुटपुंज्या अनुदानात घरकुल कसे पूर्ण करणार जी?

Fri Jan 20 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांना नगर परिषद हद्दीतील लाभार्थ्यांना दोन लक्ष 50 हजार रुपये तर ग्रामीण भागात एक लक्ष 40 हजार रुपये अनुदान दिले जाते .नागरी हद्दीतील तुलनेत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान अतिशय तुटपुंजे असून वाढत्या महागाईत घर बांधणीचे साहित्य महागल्यामुळे या किमतीत घर उभारू शकत नसल्याने ग्रामिन भागातील नागरिकात नाराजगीचा सूर वाहत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com