संदीप कांबळे, कामठी
कामठी : – पोलीस स्टेशन पासुन पुर्वेस ४ कि.मी अंतरावरील निलज (खंडाळा) येथील कैलास कारेमोरे यांच्या घरी कुणी नसल्याचे पाहुन रात्री अज्ञात चोरानी दरोडा टाकुन घरातील नगदी १ लाख रू.१० तोळे सोने, १ पाव चांदी व इतर जवळपास अदाजे २० ते २५ लाखाचा मुद्देमाल चोरून पसार झाल्याने परिसरा तील गावा मध्ये चांगलेच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत निलज (खंडाळा ) येथील गोंडेगाव-साटक जि प सदस्य व्यकटराव कारे मोरे यांचे लहान भाऊ कैलास कवडुजी कारेमोरे वय ३४ वर्ष यांचे गावालगत शेतात घर असुन ते परिवारा सह काही कामानिमित्य बाहेर गावी गेले होते. त्यांच्या घरी कुणी नसल्याची संधी साधुन बुधवार (दि.६) एप्रि ल २०२२ ला रात्री अज्ञात चोरानी दरोडा टाकुन घराती ल नगदी एक लाख रूपये, वडिलोपार्जित आजीआजो बाचे १० तोळे सोने, १ पाव चांदीचे दागीने व इतर सामान असा अदाजे जवळपास २० ते २५ लाखाचा मुद्देमाल चोरून पसार झाल्याचे गुरूवार (दि.७) एप्रिल ला लागुनच असलेल्या कुंटुबियाना लक्षात आल्याने घटनेची माहीती जि प सदस्य व्यकटराव कारेमोरे यांनी कन्हान पोलीसाना दिली तरी उशीरा सकाळी ११.३० वाजता दरम्यान कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे, पी एस आय महादेव सुरजुसे आपल्या पोलीस कर्मचा-याच्या ताफासह घटनास्थळी पोहचुन घटनेचा पुढील तपास करित आहे.
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात अवैद्य धंद्याना सुगीचे दिवस आल्याने कोळसा, रेती, लोंखड, डिझेल, घरफोडी व इतर अनेक चो-या, मारामारी, लुट मार वाढुन सर्व सामान्य नागरिकात भितीचे वातावरण निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती नाजुक होत आहे. कन्हान थानेदार विलास काळे व पोलीसा च्या कार्य पध्दतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असुन सुध्दा वरिष्ठ पोलीस अधिकारी मुंग गिळुन गप आहेत का ? अशी चर्चा कन्हान परिसरात चांगलीच रंगात येत असल्याने शासन, प्रशासनाने वेळीच संबधित पोलीस अधिका-यावर योग्य कार्यवाही करून कन्हान परिसरात शांती सुव्यवस्था कायम करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेतुन सामोर येत आहे.