२४ तास सेवा, विद्यावेतन मात्र १५ हजार ;इंटर्नशिप करणार्‍या निवासी डॉक्टरांची व्यथा शरद पवारांच्या दारी…

इतर महानगरपालिका ५० हजार पगार देते मग जगातील सर्वात श्रीमंत मुंबई मनपा का देत नाही ;निवासी डॉक्टरांची खंत…

बीएमसी मुंबई सीपीएस स्टुडंट असोसिएशनने शरद पवारांना दिले निवेदन ;शरद पवारांचा तात्काळ आयुक्तांना कॉल आणि ५० हजार विद्यावेतन मंजूर…

मुंबई :- मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात गेली कित्येक वर्षे इंटर्नशिप करणार्‍या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात ५० हजार रुपये वाढ व्हावी यासाठी आज बीएमसी मुंबई सीपीएस स्टुडंट असोसिएशनच्या निवासी डॉक्टरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत निवेदन दिले.

दरम्यान शरद पवार यांनी मुंबई आयुक्त इक्बालसिंग चहल यांना कॉल करत या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतन ५० हजार करण्याची मागणी करताच आयुक्तांनी तात्काळ ५० हजार विद्यावेतन देण्याचे जाहीर केले.

मागील दहा ते पंधरा वर्षापासून मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात इंटर्नशिप करणार्‍या निवासी डॉक्टर विद्यार्थ्यांना फक्त पंधरा हजार एवढेच विद्यावेतन देण्यात येते. राज्यातील इतर ठिकाणी निवासी डॉक्टरांना ५० हजाराच्यावर विद्यावेतन मिळते. मागीलवर्षी मुंबई मनपा फी आकारत नव्हती मात्र यावर्षी एक लाख पंधरा हजार रुपये प्रत्येक इंटर्नशिप करणार्‍या विद्यार्थ्यांना आकारली आहे. हे निवासी डॉक्टर इतर डॉक्टरांप्रमाणे २४ तास सेवा देत आहेत. सध्या हे विद्यार्थी जी फी भरत आहेत तीच पगाराच्या रुपात त्यांना मनपा प्रशासन परत करत आहे. म्हणजे एमबीबीएस होऊन मुंबई मनपा दवाखान्यात २४ तास फुकट काम करुन घेतले जात आहे. नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये पगार देत आहे. मग जगातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिका या निवासी डॉक्टरांना इतका पगार का देत नाही असा सवालही या संघटनेने केला आहे.

मुंबई मनपाच्या दवाखान्यात काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांवर त्यांच्या घरांचीही जबाबदारी आहे. मात्र एवढ्या कमी पगारात काम करवून मुंबई मनपा अन्याय करत आहे असा आरोपही बीएमसी मुंबई सीपीएस स्टुडंट असोसिएशनने दिलेल्या निवेदनात केला आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिकेत मवाळ,डॉ.रोशन गायकवाड, डॉ. आदित्य मवाळ आदी प्रतिनिधींनी शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जागतीक हिवताप दिनानिमीत्य विशेष जनजागृतीपर मोहीम

Thu Apr 27 , 2023
– प्रा.आ.केंद्र हिवरा बाजार व उपकेंद्रांमध्ये राबविली मोहीम रामटेक :- जागतिक हिवताप दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरा बाजार व उपकेंद्र स्तरावर विशेष जनजागृतीपर मोहीम राबविण्यात येत आहे. जागतिक हिवताप दिनानिमित्त तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाईकवार यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी त्यामध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन डॉ.प्राजक्ता गुप्ता वैद्यकीय अधिकारी हिवरा बाजार व आरोग्य सहायक निरंजन चिकटे, माधव धुर्वे यांनी केले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com