22 हजार लाभार्थी घेताहेत निराधार योजनेचा लाभ

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- निराधार व्यक्तींना आर्थिक अडचण जाऊ नये या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाकडून विविध अर्थसहाय्य योजना राबविण्यात येतात. कामठी तालुक्यात 22 हजार च्या जवळपास लाभार्थी निराधार योजनेचा लाभ घेत असून यासाठी महिण्याकाठी 2 कोटी 11 लक्ष 88 हजार रुपये अनुदान कामठी तालुक्याला मिळत आहे.

या योजनेची अंमलबजावणी कामठी तहसील प्रशासनाच्या माध्यमातुन केली जात असून कामठी तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे 22 हजार च्या जवळपास लाभार्थी आहेत यामध्ये इंदुरा गांधी निराधार योजना चे 8 हजार 254 लाभार्थी,श्रावणबाळ योजनेचे 11 हजार 60 लाभार्थी,इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजनाचे 1843 लाभार्थी,तसेच इंदिरा गांधी विधवा योजना,इंदिरा गांधी अपंग योजना,संजय गांधी अनुसूचित जाती, अनूसुचित जमाती योजना आदीं योजनेच्या लाभार्थीचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राह फाऊंडेशनच्या ‘समर्थ’ प्रशिक्षण केंद्राचे संदीप जोशींच्या हस्ते उद्घाटन

Thu Aug 24 , 2023
– विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण नागपूर :- राह फाऊंडेशनद्वारे तरुण तरुणींना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देणारे ‘समर्थ’ प्रशिक्षण केंद्र नागपुरात सुरू करण्यात आले आहे. शहरातील झाशी राणी चौकातील गोपालकृष्ण भवन स्थित स्पेक्ट्रम ॲकेडमी येथे या प्रशिक्षण केंद्राचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव  संदीप जोशी यांच्या हस्ते बुधवारी (ता.२३) उद्घाटन झाले. याप्रसंगी स्पेक्ट्रम ॲकेडमीचे सुनील पाटील, राह फाऊंडेशनच्या विद्या राय, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com