– वरूड मोर्शी तालुक्यातील पुलांची व रस्त्यांची होणार कामे !
– आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना यश !
मोर्शी :- मोर्शी तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार सतत प्रयत्नशील असून त्यांनी वरूड मोर्शी तालुक्यातील शिकस्त पुल, रस्ते विकास व दुरुस्तीच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून घेतलेला आहे.
राज्यात रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून राज्य शासनाने वरूड मोर्शी तालुक्यामध्ये २२ कोटी २० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून त्याची तरतूद पुरवणी अर्थसंकल्पात केली असून लवकरच वरूड मोर्शी तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील शिकस्त पुल, रस्त्यांची कामे पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी दिली.
मोर्शी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांसाठी तब्बल २२ कोटी २० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे या रस्त्यांचा विकास होऊन मतदारसंघात दळणवळण आणखी सुलभ होण्यास मदत होणार आहे. संबंधित भागाचा विकास होण्यास हातभार लागणार आहे.
वरूड मोर्शी तालुक्यातील खडाका ते पांढरघाटी रस्त्याची पुलासह सुधारणा करणे १कोटी ८० लक्ष रुपये, रावाळा ते नागाठाणा वेस्टवेअर रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करणे २ कोटी रुपये, वाई बुद्रुक पोचमार्गाची पुलासह सुधारणा करणे ६० लक्ष रूपये, पळसोना ते म. प्र. सीमेपर्यंत रस्त्याची पुलासह सुधारणा करणे १ कोटी ८० लक्ष रुपये, पांढरघाटी ते कुमुदरा जामगाव रस्त्याची पुलासह
सुधारणा करणे १ कोटी ८० लक्ष रुपये, पिंप्री ते अर्धमाणी रस्त्याची पुलासह सुधारणा करणे १ कोटी ८० लक्ष रुपये, अंबाडा ते चारुळ भंगारा रस्त्याची लहान पुलासह सुधारणा करणे १ कोटी ८० लक्ष रुपये, मलीमपुर ते रसुलपूर बेलखेडा रस्त्याची पुलासह सुधारणा करणे १ कोटी ६० लक्ष रुपये, डोंगर यावली ते घोडदेव रस्त्यावर सा. क्र.2/00 मध्ये लहान पुलाचे बांधकाम कारणे १ कोटी रुपये, चिंचोळी गवळी ते चीचपुर भिवकुंडी रस्त्याची लहान पुलासह सुधारणा करणे १ कोटी ४० लक्ष रुपये, पिंप्री ते दहसुर रस्त्याची पुलासह सुधारणा करणे १ कोटी ८० लक्ष रुपये, दहसुर ते गणेशपूर रस्त्याची पुलासह सुधारणा करणे १ कोटी ८० लक्ष रुपये, लक्ष रुपये उराड ते लोहद्रा ते राममा 353 के रस्त्याची लहान पुलासह सुधारणा करने ३ कोटी रुपये. या संपूर्ण रस्ते व पुलांच्या कामांसाठी जुलै २०२४ क्या अर्थसंकल्पात वरूड मोर्शी तालुक्यातील रस्ते व पुल बांधकाम करण्यासाठी २२ कोटी २० लक्ष रुपये भरीव निधीची तरतूद करून दिल्यामुळे मोर्शी वरूड तालुक्यातील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.
मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी याबाबत सरकारकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला होता. मोर्शी तालुक्यातील या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी पुल व मोऱ्यांच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वरूड मोर्शी तालुक्यातील रस्ते विकासाकरिता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.