– दोन्ही विधानसभेत महायुतीचे उमेदवार निवडून येणार असल्याची संपूर्ण मौदा तालुक्यात चर्चा
कोदामेंढी :- कामठी -मौदा विधानसभा क्षेत्रात मौदा तालुक्यातील मौदा, धानला ,खात व कोदामेंढी मंडळ तर रामटेक विधानसभा क्षेत्रात मौदा तालुक्यातील तारसा, निमखेडा व चाचेर मंडळाच्या समावेश आहे. त्यामुळे मौदा तालुका हा दोन आमदाराच्या क्षेत्र म्हणून ओळखला जातो.
कामठी विधानसभा क्षेत्र अंतर्गत एकूण 21 उमेदवार निवडणूक लढवीत त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे (भाजपा) विक्रांत मेश्राम (बसपा), सुरेश भोयर (काँग्रेस) अमोल वानखेडे (रिपाई ए )जगदीश वाडीभस्मे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया, डेमोक्रॅटिक )नफिस अब्दुल अलीम शेख( रासप) नितीन सहारे( भीमसेना )प्रफुल्ल मानके (वंचित बहुजन आघाडी) प्रशांत नखाते (जय विदर्भ पार्टी )प्रशांत बन्सोड (आजाद समाज पार्टी, कांशीराम )विजय डोंगरे( आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया ) तर अपक्ष म्हणून नरेंद्र गौर ,नवीद अख्तर मो. रफिक नवीद, फिरोज अहमद अंसारी ,फैय्याज अहमद अंसारी, बंटी झडावणे ,रघुनाथ सहारे, सलीम अंसारी व सुलेमान अब्बास चिराग अली हैदरी असे एकूण 21 उमेदवाराचे तर रामटेक विधानसभा क्षेत्रात आशिष जयस्वाल (शिवसेना शिंदे गट) चंद्रशेखर भिमटे (बसपा )विशाल बरबटे( शिवसेना उबाठा ) गोवर्धन सोमदेवे (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक )पंकज मासुरकर (हिंदुस्तान जनता पार्टी) प्रदीप साळवे( भीमसेना) बावनकुळे राजेंद्र भिमराव शाहीर (राष्ट्रीय गोंडवाना पार्टी) विशेष वसंता फुटाणे (बहुजन सोसालिस्ट रीपब्लिकन पार्टी ) तर अपक्ष म्हणून अंबादे प्रफुल्ल प्रेमदास, चंद्रपाल चौकसे, पुकराज कामडे मनोज बावणे, राजेन्द्र मुळक, रामेश्वरी मंगल इनवाते, रोशन रूपचंद गडे ,विजय हटवार व सचिन मारोतराव किरपान असे एकूण 17 उमेदवारांचे भाग्य काल 20 नोव्हेंबर बुधवार ला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मशीन बंद झालेले आहे. कामठी विधानसभा हा बावनकुळे यांच्या गड मानला जातो तो गड बावनकुळे यंदाही कायम राखण्यास यशस्वी होतील, तर रामटेक विधानसभा क्षेत्रात श्रीरामाचे मंदिर असलेले पवित्र तीर्थस्थळ व मिनी अयोध्या या नावाने ओळखले जाणारे रामटेक येथील रामटेकलाच राहणारे व निवडणुकीत श्रीरामाचे धनुष्यबाण हाती घेऊन निवडणुकीच्या रणांगणात सहाव्यांदा उतरणारे ऍडव्होकेट आमदार आशिष जयस्वाल पुन्हा पाचव्यांदा निवडून येणार असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती चे अनेक उमेदवार पराभूत झालेले होते. त्याच्या धसका घेत महायुती शासनाने लोकसभेच्या निवडणुका संपताच विविध योजनांच्या सपाटा न लावता त्या अमलात आणल्या व त्यामध्ये लाडली बहीण योजनेमुळे महायुतीच्या उमेदवारांना फायदा झाल्याचे अनेक नागरिक , मतदान करणाऱ्या लाडल्या बहिणी व राजकीय जाणकारांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले व त्यांनी पुन्हा राज्यात महायुती सरकार स्थापन होणार असल्याचे संकेतही दिले आहेत. त्यांनी दिलेले संकेत हे खरे की खोटे ठरतात हे येणाऱ्या 23 नोव्हेंबरला कळणार आहे.