संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-1 जानेवारी 1818 साली झालेल्या भीमा कोरेगावच्या रंनसंग्रमात पेशव्यांच्या सैन्यविरुद्ध जिंकु किंवा मरू या भावनेशि 28 हजार पेशव्या सैनिकाना फ़क्त 500 महार सैनिकांनी ठार मारुंन विजय मिळविला होता तेव्हा या वीर भीम सैनिकांच्या स्मरणार्थ आज कामठीत प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठी वतीने 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन 206वा महोत्सव वर्ष म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला .
यानुसार जयस्तंभ चौक स्थित परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट चे पदाधिकारी श्रीरामजी हटवार यांच्या हस्ते माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून विशेष बुद्ध वंदना घेऊन भीमा कोरेगाव विजयस्तंभास मानवंदना वाहण्यात आले.
याप्रसंगी माजी नगरसेवक विकास रंगारी,प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट चे संयोजक प्रमोद खोब्रागडे,राजेश गजभिये,गीतेश सुखदेवें, तिलक गजभिये, अविनाश दहाट,कोमल लेंढारे,मनोज रंगारी, आशिष मेश्राम,राजन मेश्राम, गंगा वंजारी, कृष्णा पटेल, सलमान अब्बास ,संदीप रामटेके, दुर्गेश शेंडे, प्रशांत नागदेवें, जोशेफ घरडे आदी उपस्थित होते.