दीक्षाभूमी परिसरात दररोज 18 तास पाण्याचा उपसा

– अग्निशमन विभागाचे जवान पावसातही कर्तव्यावर

नागपूर :- दीक्षाभूमी परिसरात पार्किंगसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. पाणी उपसण्यासाठी आठ मोटारपंप लावण्यात आले आहेत. यापंपाव्दारे दररोज 18 तास पाणी ओढण्याचे काम सुरू आहे. मात्र, मधून मधून पाउस येत असल्याने पाणी उपसण्यासाठी बर्‍याच अडचणी येत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठविले होते. यासोबतच एनआयटी, मनपा आणि एनएमआरडीला लेखी निवेदन पाठविले. राज्य शासनाने या विषयाची तत्काळ दखल घेतली असून येथील पाणी उपसण्याची निर्देश दिले. अग्निशमन जवान युध्दपातळीवर पाण्याचा उपसा करीत आहेत.

मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी भीमराव चंदनखेडे यांच्या मार्गदर्शनात अग्निशमन विभागाचे 20 जवान दररोज 18 तास काम करीत आहेत. सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाण्याचा उपसा करीत आहेत. पाउस येत असल्याने पाण्याची पातळी पुन्हा वाढत आहे. त्यामुळे किती दिवसात हा खड्डा रिकामा होईल, हे निश्चित सांगता येत नाही, असे चंदनखेडे म्हणाले. पावसाने विश्रांती घेतल्यास हे काम लवकर होईल, असेही त्यांनी सांगितले.

साडे सहा मीटर खोल खड्ड्यातील 30 टक्के पाण्याचा उपसा झाला आहे. दरम्यान पाउस येत असल्याने पुन्हा पाण्याची पातळी वाढत आहे. पाण्याचा उपसा करून पावसाळी पाणी वाहून नेणार्‍या नाल्याव्दारे पाणी बाहेर काढल्या जात आहे. दरम्यान भदंत ससाई या कामावर लक्ष ठेवून आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विकसित भारत @ २०४७ संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध

Sun Jul 28 , 2024
– निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री यांनी मांडली राज्याची भूमिका नवी दिल्ली :- विकसित भारत @2047 ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध असून राज्य शासनाने गरीब, शेतकरी, महिला सक्षमीकरण, युवा कल्याणासोबत सर्वांगीण विकासासाठी धोरणे बनवलीआहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राष्ट्रपती भवन येथे अशोक मंडपात नीति आयोगाच्या नवव्या नियामक परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com