नागपूर :- बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावती ह्यांनी महाराष्ट्र प्रदेश बसपाच्या अध्यक्षपदी ऍड सुनील डोंगरे यांची निवड केल्यानंतर मुंबईत प्रथमत:च राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश प्रभारी व राज्यसभा खासदार रामजी गौतम तसेच प्रदेशाध्यक्ष ऍड सुनील डोंगरे प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
ही बैठक मुंबई च्या पश्चिम दादर मधील ब्राह्मण सेवा संघ सभागृह, मनपा शाळेजवळ कबूतर खाना भवानी शंकर रोड या पत्त्यावर बुधवार 17 जुलैला सकाळी 11 वाजता होत आहे.
बसपाच्या प्रदेश, विभाग, जिल्हा, शहर, विधानसभा, सेक्टर, बुथ स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हीतचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले.