१५ ऑगष्ट हा स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाची आणि बलिदानाची आठवण करून देणारा दिवस – ॲड. नंदा पराते

नागपूर :-  १५ ऑगष्ट स्वातंत्र्य दिन या निमित्याने प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांनी मध्य नागपुरातील गुणवंत शैक्षणिक संस्था तांडापेठ, पॅराडाईज कॅान्वेंट गांधीबाग, अभिलाषा कॉन्व्हेंट बजेरिया, गरीब विद्यार्थीं शिकवणी वर्ग महाल येथील विद्यार्थ्यांची सदिच्छा भेट घेऊन शिक्षणातूनच विद्यार्थ्यांची प्रगती होऊ शकते याबाबत समजावून सांगितले आणि गरीब विध्यार्थ्यांना मोफत वह्यांचे भेटवस्तू म्हणून वाटप केले. त्यावेळी गुणवंत शैक्षणिक संस्थेचे संस्थापक मोहन सोनकुसरे,सचिव डॉ. हेमचंद्र रामटेककर, पॅराडाईज कॅान्वेंटचे संचालक सुकेश निमजे व मुख्याधापिका रश्मी बाजीराव, अभिलाषा कॉन्व्हेंटचे प्राचार्य विकेश शुक्ला,गरीब विद्यार्थींना निःशुल्क शिकवणी देणारे नरेश निमजे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

१५ ऑगष्ट स्वातंत्र्य दिन या कार्यक्रमाच्या निमित्याने मार्गदर्शन करतांना काँग्रेस नेत्या ॲड. नंदा पराते म्हणाल्या की महात्मा गांधी, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस,लाला लजपत राय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, चंद्रशेखर आझाद , सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, मौलाना अबुल कलाम आझाद, सुखदेव, राजगुरू यांच्या कठोर परिश्रमातून व हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र देश झाला. स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाची आणि बलिदानाची आठवण करून देणारा हा दिवस आहे. प्रत्येक भारतीय नागरिकासाठी १५ ऑगष्ट स्वातंत्र्य दिन सर्वात महत्वाचा दिवस आहे कारण आपल्या देशाला काँगेसच्या आंदोलनाने सन १९४७ पासून ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिल्यानंतर भारतीय संविधानातून सर्वात मोठी लोकशाही अशी आपल्या देशाची जगभरातील गणना असल्याने आम्ही या संविधानाचे व लोकशाहीचे रक्षण करू अशी शपथ घेऊ या.

७८ वा भारतीय १५ ऑगष्ट स्वातंत्र्य दिन निमित्याने विविध ठिकाणच्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे भेटवस्तू म्हणून वाटप प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत बुरडे, माया धार्मिक, शकुंतला वठ्ठीघरे, गंगाधर बांधेकर, सिद्धेश्वरी पराते, मनीषा मुंढरीकर, प्रगती मोरे, प्रीत हसोरिया यांनी अथक परिश्रम घेतले. या वह्यांचे वाटप कार्यक्रमाचे संचालन प्रेरणा पिंपळघरे तर आभार प्रदर्शन नितेश धार्मिक यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

RECORD NUMBER OF VISITORS VISIT SITABULDI FORT ON 15 AUGUST

Fri Aug 16 , 2024
Nagpur :- Sitabuldi Fort was open on 15 Aug 2024 for public on the occasion of 78th Independence Day. Inspite of heavy rains, 24,300 Nagpurians visited the Sitabuldi Fort which is located inside the Uttar Maharashtra and Gujarat Sub Area complex. Around six months back, on 26 Jan 2024 approximately 26 thousand people had visited the fort. The increase in […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!