नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरूवार (ता.१) ९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ७० हजार रुपयांचा दंड वसूल केला. यात सिव्हर लाइन ब्लॉक केल्या प्रकरणी १५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे नेल्को सोसायटी, त्रिमूर्तीनगर जवळील विवेका रुग्णालयावर वर्ष २०२२-२३ चा कचरा शुल्क न भरल्याबाबत १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत डांगळे ले आऊट स्थित विदर्भ महाकौशल हैहय क्षत्रियसभा यांच्यावर सिव्हर लाइन ब्लॉक केल्या प्रकरणी १५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. तर प्रेरणा नगर काटोल रोड येथील विशाल गद्देवार यांच्यावर सुरक्षा उपाय न करता बांधकाम साहित्य ७ व्या माळ्यावरून खाली टाकल्या प्रकरणी ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील जे. के. खोवा शॉप यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगल्या प्रकरणी ५ हजार रुपयाच्या दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत टेलिफोन एक्स्चेंज चौक क्वेटा कॉलनी येथील ताकदीर आईसवर्ड यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगल्या प्रकरणी ५ हजार रुपयाच्या दंड वसूल केला. मंगळवारी झोन अंतर्गत राज नगर येथील क्यू ३ कॅन्स्ट्रक्शन यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य टाकल्या प्रकरणी १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. कोराडी रोड झिंगाबाई टाकली येथील आयकॉन व्हिला यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य टाकल्या प्रकरणी १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. बँक कॉलनी जरीपटका येथील नंदलाल कृपलानी विना परवानगी सर्व्हीस सीवर लाईन तोडल्या प्रकरणी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राठोड ले- आऊट जाफरनगर येथील शकील वारसी यांच्यावर विना परवानगी सर्विस रोड तोडल्या प्रकरणी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
सिव्हर लाइन ब्लॉक केल्या प्रकरणी १५ हजाराचा दंड वसूल, स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com