14,138 नागरिकांनी केल्या निरुपयोगी वस्तू संकलन केंद्रात वस्तू दान

– मंगळवार दुपारी ४ पर्यंत केंद्र नागरिकांच्या सेवेत

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियानांतर्गत दिवाळीतील निरुपयोगी वस्तू संकलन केंद्र शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आले, या केंद्रावर दिवाळीत सफाई दरम्यान निघणाऱ्या निरुपयोगी वस्तू दान करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली असून, मनपाच्या या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेता, केंद्राची वेळ वाढविण्यात आली असून, नागरिक मंगळवार २९ ऑक्टोबर दुपारी ४ पर्यंत आपल्या घरातील निरुपयोगी वस्तू केंद्रावर दान करू शकणार आहेत.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल व अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनात दिवाळीतील निरुपयोगी वस्तू संकलन मोहीम सुरु केली आहे. आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी मोठ्या संख्येत मनपाच्या केंद्रांवर घरातील निरुपयोगी वस्तू दान केल्या आहेत.

रविवार २७ आणि सोमवार २८ सायंकाळ पर्यंत एकूण 14,138 नागरिकांनी 17,393.5 किलो निरुपयोगी वस्तू मनपा केंद्रात जमा केल्या. नागरिकांनी केंद्रंकडे धाव घेत घरातील घरातील पुनर्वापरण्यात येणाऱ्या किंवा निरुपयोगी वस्तु/साहित्य जसे कपडे, लाकडी वा प्लास्टिकच्या वस्तू, घरातील भांडी, खुर्च्या, खेळणी, कपाट, चपला /जोडे, पुस्तकांची रद्दी, इलेक्ट्रॉनिक वस्तू या संकलन केंद्रामध्ये जमा केल्या आहेत.

संपूर्ण शहरात मनपाद्वारे प्रभाग स्तरावर उभारण्यात आलेल्या निरुपयोगी वस्तू दान/संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रांवर नागरिकांनी आपल्या घरातील निरुपयोगी वस्तू स्वतंत्र वर्गीकरण करून केंद्रावर जमा केल्या. वर्गीकृत स्वरूपात जमा करून अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविणाऱ्या नागरिकांना नागपूर महानगरपालिकेद्वारे ‘थँक यू’चे स्टिकर्स देण्यात आले. आपल्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त होत असल्याचे बघून नागरिक भारावून केले आहेत. तरी नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि आपल्या घरातील पुनर्वापरण्यात येणाऱ्या किंवा निरुपयोगी वस्तु/साहित्य जसे कपडे, लाकडी वा प्लास्टिकच्या वस्तू, घरातील भांडी, खुर्च्या, खेळणी, कपाट, चपला /जोडे, पुस्तकांची रद्दी, इलेक्ट्रॉनिक वस्तू या संकलन केंद्रामध्ये जमा इलेक्ट्रॉनिक वस्तू संकलन केंद्रामध्ये जमा करून गरजवंताना लाभ देण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. चौधरी यांनी केले आहे.

आजवर संकलित झालेल्या वस्तू

आजवर एकूण 14,138 नागरिकांनी 17,393.5 किलो निरुपयोगी वस्तू मनपा केंद्रात जमा केल्या. या मध्ये 12726.5 किलो कापड, प्लास्टिक 912.5किलो, कागद 586.5 किलो, ई वेस्ट 673.5किलो, घरगुती वस्तू 170 किलो, लाकडी 785 किलो आणि अन्य वस्तू 1010.5 किलो प्राप्त झाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डीपीएस मिहान ने एक सफल कैरियर मेला 2.0 आयोजित किया

Tue Oct 29 , 2024
नागपूर :- डीपीएस मिहान में कैरियर मेला 2.0 जानकारीपूर्ण सत्रों, एक-पर-एक आकर्षक बातचीत और मूल्यवान कनेक्शन से भरा एक ज्ञानवर्धक सम्मेलन था। यह मेला 26 अक्टूबर 24 को आयोजित किया गया था, जिससे कक्षा IX-XII के छात्रों को विविध कार्यक्रमों का पता लगाने, संभावित सलाहकारों से मिलने और अग्रणी विश्वविद्यालयों के साथ अपनी शैक्षणिक यात्रा में अगला कदम उठाने का […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!